अनाथ

बहुदा, ज्याचा कोणी पालक नाही अशा व्यक्तींना विशेषतः मुला-मुलींना अनाथ असे संबोधले जाते. लहान अनाथ मुले धनार्जन करून स्वतःचे पालनपोषण करू शकत नाहीत. त्यांना पालनपोषणासाठी दुसऱ्यांवर किंवा समाजावर अवलंबून रहावे लागते. महाराष्ट्र शासनाने अनाथ मुलांना महाराष्ट्रात खूल्या (ओपन) प्रवर्गातील जागेत १% आरक्षण मंजूर केले आहे.