अलामीडा काउंटी (कॅलिफोर्निया)
अलामीडा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार, येथील लोकसंख्या १६,८२,३५३ होती. [१] [२] या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र ओकलंड आहे.[३] ईस्ट बेमध्ये असलेल्या अलामीडा काउंटीचा प्रदेश काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियामध्ये गणला जातो.
इतिहास
अलामीडा काउंटीच्या रचनेच्या वेळी तिचे प्रशासकीय केन्द्र अल्व्हाराडो येथे होते. हा प्रदेश आता युनियन सिटीचा भाग आहे. १८५६ मध्ये सान लिअँड्रो प्रशासकीय केन्द्र झाले. १८६८मध्ये झालेल्या मोठ्या भूकंपात येथे मोठा विनाश झाला व प्रशाकीय केन्द्र ब्रुकलिन येथे हलविण्यात आले. पुढे ब्रुकलिन ओकलंड शहराचा भाग झाले व ओकलंडला हे प्रशासकीय केन्द्र १८७३पासून आहे.
अलामीडा काउंटीच्या पश्चिमेला सान फ्रान्सिस्को शहर आणि काउंटी आहे. सान फ्रान्सिस्कोपासून खाडीपल्याड असलेल्या या शहराला अलामीडा काउंटीशी जमिनीवरही छोटी सीमा आहे.[४] अलामीडाच्या दक्षिणेस सांता क्लारा तर पूर्वेस सान होआक्विन आणि उत्तरेस काँत्रा कॉस्टा काउंट्या आहेत. अलामीडा काउंटीला दक्षिणेस स्टानिस्लॉस काउंटीशी ७६ मी (२५० फूट) लांबीची सीमा आहे.[५]
शिक्षणसंस्था
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे बर्कली आवार अलामीडा काउंटीमध्ये आहे. हे विद्यापीठ जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठित संशोधन विद्यापीठांपैकी एक समजले जाते.
याशिवाय काउंटीमध्ये इतर अनेक महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत.:
- बर्कले सिटी कॉलेज
- कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, ईस्ट बे
- चाबोट कॉलेज दोन वर्षांची पदवी देणारेसार्वजनिक महाविद्यालय
- कॉलेज ऑफ अलामीडा, दोन वर्षांची पदवी देणारेसार्वजनिक महाविद्यालय
- लास पॉझिटास कॉलेज
वाहतूक
प्रमुख महामार्ग
रेल्वे
- अल्टामाँट कॉरिडॉर एक्सप्रेस (ACE) – सान होआक्विनसॅन जोक्विन काउंटी ते सांता क्लारा काउंटीपर्यंतचा मार्ग
- अॅमट्रॅक
- कॅलिफोर्निया झेफिर - एमरीव्हिल आणि शिकागो दरम्यान धावणारी इंटरसिटी ट्रेन मार्ग.
- कॅपिटल कॉरिडॉर - सान होजे आणि साक्रामेंटोपर्यंतचा मार्ग
- कोस्ट स्टारलाइट - लॉस एंजेलस आणि सिअॅटल दरम्यानचा रेल्वेमार्ग
- सान होआक्विन - फ्रेस्नो आणि सेंट्रल व्हॅली मार्गे ओकलंड आणि बेकर्सफील्डमधीलचा अॅमट्रॅक मार्ग
- बे एरिया रॅपिड ट्रान्झिट (बार्ट) – सान फ्रान्सिस्को आणि ईस्ट बे दरम्यानचा जलदगती उपनगरी मार्ग
बस
- एसी ट्रान्झिट - पश्चिम अल्मेडा काउंटी आणि पश्चिम कॉन्ट्रा कोस्टा काउंटीमधील स्थानिक बस प्रणाली, अलामीडा काउंटीपासून मध्यवर्ती सान फ्रान्सिस्को, सान मटेओ आणि पालो आल्टो या शहरांना सेवा
- व्हील्स - आग्नेय अलामीडा काउंटीच्या शहरांमधील बस प्रणाली
- युनियन सिटी ट्रान्झिट – युनियन सिटी शहरातील थानिक बससेवा
- एमरी-गो-राउंड – एमरीव्हिलमधील मोफत बस सेवा
- डम्बर्टन एक्सप्रेस – फ्रिमाँट आणि पालो आल्टो दरम्यान डम्बार्टन पुलावरुन जाणारी बससेवा
- सांता क्लारा व्हॅली ट्रान्सपोर्टेशन अथॉरिटी (VTA) – दक्षिण अलामीडा काउंटी आणि सिलिकॉन व्हॅली दरम्यानची प्रवासी सेवा
फेरीबोट
- अलामीडा/ओकलंड फेरी आणि हार्बर बे फेरी - ओकलंड, अलामीडा आणि बे फार्म आयलँडला मध्यवर्ती सान फ्रान्सिस्कोशी जोडणारी बोटसेवा.
विमानतळ
ओकलँड आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील सर्वात मोठा विमानतळ आहे. याशिवाय हेवर्ड एक्झिक्युटिव्ह विमानतळ आणि लिव्हरमोर म्युनिसिपल विमानतळ हे दोन छोटे विमानतळही आहेत.
संदर्भ
- ^ "U.S. Census Bureau QuickFacts: Alameda County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2020. September 20, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Alameda County, California". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. January 30, 2022 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. May 31, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 7, 2011 रोजी पाहिले.
- ^ "Why Is Part of Alameda Island in San Francisco?". KQED. November 1, 2018.
- ^ "The National Map - Advanced Viewer". 2017-10-29 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-12 रोजी पाहिले.