अलेक्झांडर फ्लेमिंग

अलेक्झांडर फ्लेमिंग
जन्म अलेक्झांडर फ्लेमिंग
६ ऑगस्ट इ.स. १८८१
लोकफेल्ड, स्कॉटलॅंड
मृत्यू ११ मार्च इ.स. १९५५
लंडन
चिरविश्रांतिस्थान सेंट पॉल कॅथेड्रल लंडन
राष्ट्रीयत्व स्कॉटिश
शिक्षण MBBS
प्रशिक्षणसंस्था इन्पेरिअल कॉलेज लंडन
पेशा वैद्यकीय
प्रसिद्ध कामे पेनिसिलिनचा शोध
धर्म ख्रिस्ती
जोडीदार सारा मारियान व आमेलिया
वडील हयुज फ्लेमिंग
आई ग्रेस
पुरस्कार नोबेल पारितोषिक इ.स. १९४५
स्वाक्षरी

सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. (जन्म ६ ऑगस्ट १८८१ - म्रुत्यु ११ मार्च १९५५). त्यांनी केलेल्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल व त्याचा प्रतिजैविक म्हणून वापराच्या शोधाबद्दल त्यांना १९४५ मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.[] त्यांच्या या शोधाने वैद्यकक्षेत्रात प्रतिजैविकांचे युग चालू झाले व त्यामुळे अनेक अवघड जीवघेण्या रोगांवर मात करणे शक्य झाले. त्यांच्या पेनिसिलीनच्या शोधाबद्दल कहाणी प्रसिद्ध आहे. त्यांनी जीवाणूंचे ताटलीमध्ये कल्चर तयार केले होते. या कल्चरमध्ये चूकून पेनिसिलिन नामक बुरशी येउन पडली व त्यामुळे जीवाणूंचे संपूर्ण कल्चर मृत झाले. आपले श्रम वाया गेले म्हणून फ्लेमिंग ती ताटली फेकून देणार होते. परंतु त्याचवेळेस हे कल्चर का मृत झाले याबद्दल जीज्ञासा निर्माण झाली व पेनिसिलीन ही बुरशी जीवाणूंसाठी मरण आहे हे लक्षात आले व प्रतिजैविकांचा शोध लागला.

फ्लेमिंग यांनी जीवाणूशास्त्र, केमोथेरेपी यांवरती अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "The Nobel Prize in Physiology or Medicine 1945" (इंग्रजी भाषेत). १९ ऑक्टोबर २०१३ रोजी पाहिले. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)