इदाल्गो (संपूर्ण नाव: इदाल्गोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Hidalgo)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पाचुका दे सोतो ही इदाल्गोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६ जानेवारी, इ.स. १८६९ साली बेनितो हुआरेझने इदाल्गो राज्याची स्थापना केली. मेक्सिकन संघात सामील होणारे ते २६वे राज्य होते.
भूगोल
मेक्सिकोच्या पूर्व भागात २०,८४६ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २६व्या क्रमांकाचे मोठे आहे.