एच.टी.सी. वाईव

एच.टी.सी. वाइव्ह हा एक उच्च दर्जाचा आभासी-वास्तव (व्हर्चुअल रिॲलिटी) हेड सेट आहे. एच.टी.सी. आणि वाल्व कॉर्पोरेशनने ५ एप्रिल २०१६ रोजी हा बाजारात विकायला आणला. हा हेड सेट रूम स्केल तंत्रज्ञानाचा वापर करून बनविण्यात आले आहे ज्यामध्ये खोलीचे त्रिआयामी आभासी जगात रूपांतर केले जाते. विविध सेन्सर्स आणि हातात असलेल्या कंट्रोलरच्या सहाय्याने आभासी जगातील गोष्टींशी परस्परसंवाद साधला जातो.[१] एच.टी.सी.च्या मार्च २०१५ च्या जागतिक मोबाईल काँग्रेसच्या भाषणात प्रकाशित केल्यापासून एच.टी.सी. वाईव ने सी.इ.एस. २०१६ मध्ये २२ पुरस्कार मिळवले आहेत ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट सी.इ.एस.चा पुरस्कार सुद्धा आहे.

विकास

वाल्व निर्मित आभासी वास्तव प्रणालीचे नमुने २०१४ मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. २३ फेब्रुवारी २०१५ला वाल्व ने २०१५ च्या गेम डेवलपर्स कॉन्फरन्स मध्ये ‘स्टीम वी.आर हार्डवेर प्रणाली’चे प्रदर्शन करणार असल्याची घोषणा केली.[२] एच.टी.सी. ने अधिकृतपणे त्यांचे उपकरण ‘वाईव’, त्यांच्या १ मार्च २०१५ च्या जागतिक मोबाईल काँग्रेसच्या भाषणात प्रदर्शित केले. २९ फेब्रुवारी २०१६ला सकाळी १० वाजेपासून त्याच्या प्री-ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली.[३] एच.टी.सी. आणि वाल्व ने घोषणा केली आहे कि काही निवडक डेवलपर्सना हेडसेट मोफत देण्यात येतील.[४] कन्झ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो २०१६ मध्ये एच.टी.सी. आणि वाल्वने वाईवला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी त्याचीच एक पूर्व आवृत्ती ‘एच.टी.सी. वाईव प्री’ प्रदर्शित केली.[५] स्टीम व्हीआर, युनिटी प्लॅटफॉर्मला नेटिव सपोर्ट देईल.[६] वाईवची पुढची आवृत्ती जिचे सांकेतिक नाव वाईव २- ओआसीस आहे, निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात असल्याची गेब नेवेल यांनी पुष्टी केली आहे. वाईव २ मध्ये छोटे पण अधिक प्रभावी लाईटहाउसेस, नवीन कंट्रोलर, विशिष्ट्य डिस्प्ले तंत्रज्ञान आणि लहान व हलका वायरलेस हेडसेट असणार आहे.

इतिहास

२०१५ च्या मुख्य भाषणात फिल चेन, एच.टी.सी.चे मुख्य विषय अधिकारी तसेच एच.टी.सी. वाईवचे संस्थापक यांनी सांगितले कि, त्यांच्या मनात व्हीआरची कल्पना आली, अनपेक्षितपणे एच.टी.सी.ला वाल्व मिळाली आणि त्यांनी वाईवची निर्मिती केली चेन यांनी हेही सांगितले कि एच.टी.सी. आणि वाल्वमध्ये जबाबदारीचे स्पष्ट असे वाटप झालेले नसून, एच.टी.सी. मुख्यतः संशोधन आणि विकास विभागाची जबाबदारी सांभाळत आहे.[७] नोव्हेंबर २०१६मध्ये एच.टी.सी. ने टीपीकास्ट निर्मित टीदरलेस व्हीआर अपग्रेड कीटची घोषणा केली. सीइएस २०१७मध्ये याच्या पब्लिक मॉडेलची घोषणा करण्यात आली ज्याची किंमत $२४९ होती. २०१७ला गूगल आय.ओ. मध्ये, गूगलने आल इन-बिल्ट ‘स्टॅंडअलोन व्हीआर’ प्रणालीची घोषणा केली, जी वाईवची टीम आणि लेनेवोच्या सहकार्याने बनवली जाईल.[८]

तांत्रिक वैशिष्ट्ये

वाईवला ९० हर्ट्झचा रिफ्रेश रेट आहे. या उपकरणाला एका डोळ्यासाठी एक याप्रमाणे १०८० x १२०० चे रिझोल्यूशन असलेल्या दोन स्क्रीन्स आहेत.[९] या उपकरणात ७० पेक्षा जास्त सेन्सर्सचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये एमइएमएस गायरोस्कोप, एक्सेलेरोमीटर आणि लेसर पोसिशन सेन्सर्सचा समावेश आहे. त्याची लाईटहाउस सिस्टीमची रचना ॲलन येत्स याने केली आहे आणि ती ज्या ऑब्जेक्टचा वापर करायचा आहे त्याच्यावर लावलेल्या सामान्य फोटोसेन्सर्सचा वापर करते. कुठल्याही प्रकारची धडक बसू नये म्हणून ही प्रणाली दुसऱ्या दोन लाईटहाउस स्टेशन्स बरोबर वापरण्यात आली आहे.

समोर असलेल्या कॅमेऱ्यामुळे रूममध्ये असलेल्या स्थिर किंवा हलणाऱ्या वस्तू ओळखण्यास मदत होते. यामुळे व्यक्तीला कुठल्याही अडथळ्यापासून वाचवण्यासाठी कॅमेऱ्याच्या फीड डिस्प्लेवर दाखवली जाते.[१०] वाईवला सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालणाऱ्या संगणकांची आवश्यकता होती. जून २०१७मध्ये एच.टी.सी. आणि वाल्वने, वाईव आणि स्टीम व्हीआर मॅक ओएस वर चालणाऱ्या संगणकांसाठी आणण्याचे घोषित केले.[११]

गेम्स

मार्च २०१६पर्यंत, जेव्हा एच.टी.सी. वाईवच्या प्री-ऑर्डर्सला सुरुवात झाली होती तेव्हा आभासी-वास्तव प्रकारामध्ये १०७ गेम्स बाजारात येण्यासाठी तयार होते.[१२] रेव्हाइव नावाचा ओपन सोर्स प्रोग्राम वापरून ओकुलस रीफ्टचे गेम्स एच.टी.सी. वाईवसाठी वापरता येतात.

संदर्भ