ए.आर. रहमान

अल्लाह रक्खा रहमान

ए.आर. रहमान
आयुष्य
जन्म ६ जानेवारी, १९६७ (1967-01-06) (वय: ५८)
जन्म स्थान चेन्नई, तमिळनाडू
संगीत साधना
गायन प्रकार संगीत दिग्दर्शक, गीतकार, पार्श्वगायक
संगीत कारकीर्द
कारकिर्दीचा काळ १९८७ - चालू

अल्लाह रक्खा रहमान (तामिळ: ஏ. ஆர். ரகுமான், जन्म नाव: ए.एस. दिलीपकुमार, திலீப் குமார்) हे एक जगप्रसिद्ध भारतीय संगीतकार आहेत. आपल्या काळामधील सर्वश्रेष्ठ संगीतकार मानल्या जात असलेल्या रहमानने आजवर अनेक भाषांमधील चित्रपटांना संगीत देऊन जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. रोजा, बॉम्बे, रंगीला, दिल से, लगान, रंग दे बसंती हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. २००८ साली प्रदर्शित झालेल्या स्लमडॉग मिलियोनेर ह्या इंग्रजी चित्रपटाच्या संगीतासाठी ए. आर. रहमान यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

रहमान यांना आजवर दोन ऑस्कर पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक बाफ्टा पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार, चार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ फिल्मफेअर पुरस्कार व १३ फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण मिळाले आहेत. आजवरच्या त्यांच्या दोन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना भारतीय संगीताला नवी ओळख दिल्याचे श्रेय दिले जाते.

संगीतबद्ध चित्रपट

हिंदी चित्रपट

वर्ष चित्रपट पुरस्कार
१९९५ रंगीला फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
१९९६ फायर
१९९६ दौड
१९९७ विश्वविधाता
१९९७ कभीना कभी
१९९८ दिल से.. फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
१९९८ १९४७: अर्थ
१९९८ डोली सजाके रखना
१९९९ ताल फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
१९९९ तक्षक
२००० पुकार
२००० झुबैदा
२००१ वन टू का फोर
२००१ नायक
२००१ लव्ह यू हमेशा
२००१ लगान फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००२ द लेजंड ऑफ भगत सिंग
२००२ साथिया फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००३ तहजीब
२००४ लकीर
२००४ मिनाक्षी
२००४ युवा
२००४ स्वदेस
२००४ दिल ने जिसे अपना कहा
२००५ नेताजी सुभाषचंद्र बोस
२००५ मंगल पांडे
२००५ वॉटर
२००६ रंग दे बसंती फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००७ गुरू फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००७ प्रव्होक्ड
२००८ जोधा अकबर
२००८ जाने तू... या जाने ना फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००८ युवराज
२००८ अदा
२००८ गजनी
२००९ दिल्ली 6 फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२००९ ब्ल्यू
२०१० रावण
२०१० झूठा ही सही
२०११ रॉकस्टार फिल्मफेअर सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार
२०१२ एक दीवाना था
२०१२ जब तक है जान
२०१३ रांझणा
२०१४ हायवे

विदेशी चित्रपट

तमिळ चित्रपट

१) रोजा
२) पुदिय मुगम
३) जंटलमन
४) किळिक्कु चीमायिले
५) उळवन
६) तिरुडा तिरुडा
७) वन्डिचोलै चिन्रासु
८) ड्युएट
९) मे मादम
१०) कादलन
११) पवित्र
१२) करुत्तम्मा
१३) पुदिय मनरगळ
१४) मनिता मनिता
१५) बॉम्बे
१६) इन्दिरा
१७) मुतु
१८) लव्ह बर्ड्स
१९) इन्दियन
२०) कादल देसम
२१) मी.रोमिओ
२२) अन्तिमन्तारै
२३) मिन्सार कनवु
२४) इरुवर
२५) रत्चगन
२६) मोना लिसा
२७) जीन्स
२८) मुदलवन
२९) ताज महाल
३०) अलैपायुदे
३१) कन्डुकोन्डेन कन्डुकोन्डेन
३२) रिदम
३३) तेनाली
३४) बाबा
३५) कादल व्हायरस
३६) परसुराम
३७) बॉयस
३८) एनक्कु २० उनक्कु १८
३९) कन्गळाल कैदु सेय
४०) आयदु येळुदु
४१) न्यु
४२) अन्बे आरुयिरे
४३) सिल्लनु ओरु कादल
४४) वर्लारु
४५) गुरू
४६) सिवाजी द बॉस
४७) अळगीय तमिळ मगन
४८) सक्करकट्टि
४९) विनैत्तांडि वरुवाया
५०) अशोकवनम
५१) एंदिरम
५२) द नाईन्टिन्थ स्टेप

तेलुगु चित्रपट

  • ग्यांग मास्टर्
  • सूपर पोलीस
  • निप्पु रव्व
  • अडवि राणि
  • रक्षकुडु
  • नी मनसु नाकु तेलुसु
  • नानी

बाह्य दुवे