ग्विटी नोविन
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c7/GuityNovin.jpg/220px-GuityNovin.jpg)
ग्विटी नोविन (रोमन लिपी: Guity Novin) (२१ एप्रिल, इ.स. १९४४: केर्मानशाह, इराण - हयात) ही इराणी-कॅनेडियन चित्रकार, ग्राफिक संकल्पक आहे. ट्रान्सइंप्रेशनिझम् चित्रशैली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चित्रशैलीची ही उद्गाती मानली जाते[ संदर्भ हवा ].
तिने कॅनड्यातील व्हॅंकुव्हर आणि टोरॅंटो शहरांत वास्तव्य केले. इ.स. १९७० साली तेहरानमधील ललित कला शाखेतून त्यांनी पदवी घेतली. इराण सोडल्यावर ती नेदरलॅंड्समधील हेग येथे गेली. त्यानंतर काही काळ तिने मॅंचेस्टर, इंग्लंड येथे आपले शिक्षण पूर्ण केले. इ.स. १९८० साली ती कॅनड्यात कायमस्वरूपी हलली.
चित्रदालन
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/4a/Commons-logo.svg/50px-Commons-logo.svg.png)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत