जामखेड तालुका

हा लेख जामखेड तालुका विषयी आहे. जामखेड शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
जामखेड तालुका
जामखेड is located in अहमदनगर
जामखेड
जामखेड
जामखेड तालुक्याचे अहमदनगर जिल्ह्याच्या नकाशावरील स्थान

राज्य महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा अहमदनगर जिल्हा
जिल्हा उप-विभाग कर्जत
मुख्यालय जामखेड

क्षेत्रफळ ८७८.६२ कि.मी.²
लोकसंख्या १,३४,२३८ (२००१)
साक्षरता दर ४३.८५
लिंग गुणोत्तर १.०५ /

प्रमुख शहरे/खेडी [खर्डा]व नान्नज, जवळा इतर तालुक्यातील सर्व शहरे खेडी
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर-दक्षिण
विधानसभा मतदारसंघ कर्जत-जामखेड
आमदार मा श्री रोहित पवार
पर्जन्यमान १७८ मिमी

कार्यालयीन संकेतस्थळ

जामखेड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील एक तालुका आहे. दळण वळणाची दृष्ट्या एक महत्त्वाचा तालुका म्हणून जामखेडची ओळख आहे. तीन जिल्ह्याचे हद्दी या तालुक्याला जोडून आहेत. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ही जामखेडला ओळखतात.दिवंगत मेबल अरोळे यांनी सुरू केलेले CRHP प्रकल्प जामखेड तालुक्यात स्तिथ आहे. रेमेन मगेसेसे पुरस्कार विजेते रजनीकांत आरोळे आणि त्यांची पत्नी मेबेल आरोळे यांची कर्मभूमी जामखेड आहे. जगातील कानाकोपऱ्यातून आरोग्य तसेच सामाजिक क्षेत्रातील विद्यार्थी, पर्यटक या प्रकल्पाला भेटी देण्यास जामखेड येथे येत असतात. जामखेड तालुक्यातील आठवडी बाजार प्रसिद्ध आहे, जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते, तसेच राज्यभरातील जनावरांच्या व्यापाऱ्यांची रेलचेल इथे असते. जामखेड येथे अन्न धान्याची मोठी बाजार पेठ आहे, जामखेडची ज्वारी संपूर्ण महाराष्ट्रात पसंत केली जाते. खर्डा हे तालुक्यातील ऐतिहास स्थळ आहे तेथे किल्ला व निजामाच्या काळातील गढी आहे.

चोंडी

चोंडी अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान म्हनुन विशेष महत्त्व आहें. चोंडी आता पर्यटन क्षेत्र म्हनुन प्रसिद्ध होत आहें.

चोंडी येथिल पर्यटकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहें.

प्रेक्षणीय स्थळे

  • अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले महादेव मंदिर
  • जीर्णोद्धार केलेला राजवाडा
  • अहिल्याबाई होळकर स्मृतिस्तंभ
  • अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा
  • महादेव मंदिराजवळील बगीचा व राशिचक्र देखावा(मुर्ती)
  • ग्रामदैवत चोंडेश्वरी मंदिर

देवदैठण

देवदैठण प्रसिद्ध खंडोबा पुरातन मंदिर

चैत्र महिन्यात भव्य जत्रेत मानाच्या काठ्यांची मिरवणूक

खर्डा

खर्डा

खर्ड्याची लढाई ऐतिहासिक महत्त्व भुईकोट किल्ला पर्यटन विशेष भारतातील सर्वात मोठा स्वराज्य ध्वज या खर्डा किल्ल्यावर आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नांतून उभारण्यात येणार आहे.

हळगाव

हळगाव जय श्रीराम शुगर अँड ॲग्रो प्राॅडक्टस्

जामखेड तालुका तिल पहिला साखर कारखाना श्री राजेंद्र (तात्या) फाळके पा. यांनी उभा केला पायाभरणी - दिलीप वळसे पा. व आर आर पाटील यांच्या हस्ते करन्यात आली

कृषी महाविद्यालय हळगाव जामखेड तालुक्यातील एकमेव शासकीय कृषी महाविद्यालयाची स्थापना हळगाव येथे करण्यात आली आहे.

जामखेडची नागपंचमी व नागपंचमी

जामखेड श्रावण महीना मध्ये नागपंचमी रोजी मोठी यात्रा भरते

जामखेडची नाचपंचमी सुद्धा विशेष प्रसिद्ध आहे

(नान्नज) हे जामखेड तालुक्यातील एक प्रमुख गाव असून ऐतिहासिक दृष्ट्या विशेष आहे. येथे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे,शिवकालीन बारव, प्रसिद्ध नंदादेवी मंदिर,अनेक जुने वाडे, इत्यादी इथे पर्यटन स्थळे आहेत.या गावची आषाढी यात्रा खूप प्रसिद्ध आहे.महाराष्ट्रातील विविध भागातून यात्रेकरू आषाढी यात्रे साठी नान्नज गावी येत असतात.यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.