जावेद अख्तर
जावेद अख्तर | |
| |
जन्म | जानेवारी १७, इ.स. १९४५ ग्वाल्हेर, भारत |
कार्यक्षेत्र | साहित्य (कविता, गीते) चित्रपट (पटकथालेखन) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
भाषा | उर्दू, हिंदी |
प्रमुख चित्रपट | डॉन |
पुरस्कार | फिल्मफेअर सर्वोत्तम गीतकार पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
पत्नी | शबाना आझमी |
अपत्ये | फरहान अख्तर, झोया अख्तर |
जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदी व उर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.
त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.
जावेद अख्तर यांची पटकथा आणि गीते असलेले काही चित्रपट
- अंदाज (दुसरा)
- जंजीर
- डॉन (१९७८)
- दिल चाहता है
- दीवार
- शोले
- सागर (१९८५)
- सिलसिला
- सीता और गीता
जावेद अख्तर यांना मिळालेले पुरस्कार
- पद्मभूषण
- साहित्य अकादमी पुरस्कार
बाह्य दुवे
- अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील जावेद अख्तर चे पान (इंग्लिश मजकूर)
- कविताकोशावर जावेद अख्तर Archived 2009-04-23 at the Wayback Machine. (हिंदी मजकूर)