जेम्स पोक

जेम्स नॉक्स पोक

सही जेम्स पोकयांची सही

जेम्स नॉक्स पोक (इंग्लिश: James Knox Polk ;) (२ नोव्हेंबर, इ.स. १७९५; मेक्लेनबर्ग काउंटी, उत्तर कॅरोलिना, अमेरिका - १५ जून, इ.स. १८४९) हा अमेरिकेचा अकरावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८४५ ते ४ मार्च, इ.स. १८४९ या काळात त्याने अध्यक्षपद सांभाळले.

पोक याचा जन्म अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन्यात झाला असला तरी याचे बरेचसे जीवन टेनेसीत गेले. अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहात तो टेनेसीचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेला. इ.स. १८३५ ते इ.स. १८३९ या कालखंडात त्याने अमेरिकेच्या प्रतिनिधिगृहाच्या सभापतिपदाची, तर इ.स. १८३९ ते इ.स. १८४१ या कालखंडात टेनेसीच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली.

याने आपल्या राष्ट्राध्यक्ष काळात मॅनिफेस्ट डेस्टिनीची घोषणा केली व तत्कालीन अमेरिकेच्या पश्चिमेकडे वर्चस्व वाढवण्यास आरंभ केला.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत