नंगा पर्वत

नंगा पर्वत

नंगा पर्वत (शब्दशः नग्न पर्वत) हा जगातील सर्वोच्च पर्वतांच्या यादीतील नवव्या क्रमांकाचा पर्वत असून त्याच्या सर्वोच्च शिखराची उंची ८,१२६ मी इतकी आहे. हे शिखर पूर्वी अतिशय खडतर मानले जायचे. त्याचे कारण याची अतिशय खडी चढाई व बर्फ व बेस कॅंपपासूनची उंची हे होते. अजूनही जगभरातल्या गिर्यारोहकांना या पर्वताची भुरळ आहे.

भूगोल

नंगा पर्वत हे हिमालयाचे पश्चिम टोक मानले जाते. या पुढील (उत्तर व पश्चिमेकडील) रांगा काराकोरम पर्वताच्या मानल्या जातात. काराकोरम रांग व नंगा पर्वत यांच्यामधून सिंधू नदी वाहते व ती नंगा पर्वताच्या उत्तरेकडे आहे.

नंगा पर्बत हे शिखर जगातील सर्वात झपाट्याने उंचावणारे शिखर आहे. परंतु याचबरोबर याची मृदा व येथे होणारी बर्फवृष्टी यामुळे याची सर्वाधिक झीज होणाऱ्या पर्वतांमध्येही गणना होते. हा भाग हिमालयातील सर्वांत शेवटी तयार झालेला भाग आहे. भूगोलतज्ज्ञांनुसार नंगा पर्बत शिखर तयार होण्यापूर्वी सिंधू नदी ही मध्य अशियात जात होती. नंगा पर्वत व काराकोरम रांगांमुळे हा भूभाग अजून उंचावला व सिंधू नदी अरबी समुद्राकडे वळवली गेली.[]

वैशिष्ट्य

नंगा पर्वताची खडी चढण अतिशय खडतर आहे. त्याच्या बेस कॅंपपासून शिखराची उंची ४,६०० मी (१५,००० फूट) इतकी आहे. तर उत्तरेकडे वाहणाऱ्या सिंधू नदी (अंदाजे २७ किमी) पासून हे शिखर ७००० मी इतकी उंची गाठते. त्यामुळे जगातील सर्वाधिक उताराच्या भूभागात या शिखराचा समावेश होतो.

बेस कॅंप पासून

सु‍रूवातीच्या चढाया

बराच काळ नंगा पर्वत हे सर्वोच्च शिखर मानले जात होते. त्यामुळे नंगा पर्वतावर पहिल्यापासूनच गिर्यारोहण मोहिमा आखल्या होत्या. पहिली मोहीम १८९५ मध्ये अलबर्ट ममेरी यांनी काढली होती. ही मोहीम असफल झाली. ममेरी व इतर दोन गुरखा सैनिकांना यात जीव गमवावा लागला.

१९३० मध्ये पुन्हा नंगा पर्वत गिर्यारोहकांचे आकर्षण बनला. खास करून जर्मन व ऑस्ट्रियन गिर्यारोहकांना याचे आकर्षण होते. एव्हरेस्टवर ब्रिटिशांनी मोहीम काढण्यास प्रतिबंध केला होता व के२ व कांचनगंगा ही शिखरे अवघड व अतिदुर्गम होती. त्यामुळे जर्मन गिर्यारोहकांनी याला आपले लक्ष्य बनवले होते.[]

जर्मन गिर्यारोहकांनी अनेक मोहिमा राबवल्या, ज्या बहुतांशी असफल झाल्या. याचे महत्त्वाचे कारण, हिमालयाची उंची आल्पसच्या सर्वात उंच शिखरापेक्षा दुप्पट होती त्यामुळे अतिउंचावर होणाऱ्या त्रासामु़ळे अनेक मोहिमांमध्ये ते असफल झाले.[].१९३७ च्या कार्ल वीन यांच्या मोहिमेत अतिबर्फवृष्टीमुळे १६ गिर्यारोहकांना जीव गमवावा लागला होता.[] १९३९ मधील मोहिमेचे वर्णन सेव्हन यिअर्स इन् तिबेट या पुस्तकात आहे. ह्या पुस्तकाचे लेखक हाइनराईश्च हारर हे स्वतः मोहिमेत होते.[]

यशस्वी चढाई

रुपल येथील कडा

अर्ध्या शतकाहून अधिक काळाच्या प्रयत्‍नांनंतर सरतेशेवटी ३ जुलै १९५३ रोजी ऑस्ट्रियन गिर्यारोहक हरमान बुहल यांनी नंगा पर्वत सर केला. ही मोहीम जर्मनी व ऑस्ट्रिया यांची संयुक्त मो्हीम होती. ह्या मोहिमेचे नेतृत्व त्यांचे बंधू विली मेर्कल व पेतर ॲशेनब्रेनर यांच्याकडे होते. या मोहिमेतील बहुतेक लोकांना आधीच्या असफल मोहिमांचा अनुभव होता.[] शेवटच्या टप्यात उशीर झाला व इतर सहकारी मागे फिरले तरी बुहल यांनी शिखराकडे एकट्याने वाटचाल चालू ठेवली. शिखर संध्याकाळच्या ७ वाजता सर झाले. पण परतीची वाट अंधारात काढणे अतिशय खडतर होते. बुहल यांनी कड्याच्या अतिशय अरुंद जागेत आपला तळ ठोकला. बुहल लिहितात की ती रात्र अतिशय शांत असल्याने त्यांना नंगा पर्वतवरील बोचऱ्या वाऱ्यांच्या त्रास झाला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी हळूह्ळू आपली वाटचाल तळाकडे चालू ठेवली व संध्याकाळपर्यंत ते तळावर पोहोचले.[] या मोहिमेत केवळ बुहल हेच शिखर सर करण्यात यशस्वी झाले. ज्यात ऑक्सिजनचा वापर झाला नाही अशी ही पहिली चढाई होती, व पुढील कित्येक वर्षे ज्यांनी ८००० मीटरांवरील शिखरांच्या चढाया बिना ऑक्सिजनने पार पाडल्या असे बुहल हेच एकमेव गिर्यारोहक होते

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ डिस्कव्हरी चॅनेल डॉक्युमेंटरी-नंगा पर्वत
  2. ^ Neale, Jonathan. Tigers of the Snow. pp. pp.63-64.CS1 maint: extra text (link)
  3. ^ Mason, Kenneth. Abode of the Snow. pp. pp.226-228.CS1 maint: extra text (link)Reprinted 1987 by Diadem Books, ISBN 978-0-906371-91-6
  4. ^ Neale, pp.212-213
  5. ^ Mason pp.238-239
  6. ^ This includes two British climbers who disappeared low on the mountain in December 1950. They were studying conditions on the Rakhoit glacier, not attempting the summit. See Mason p.306.
  7. ^ Sale, Richard. Climbing the World's 14 Highest Mountains: The History of the 8,000-Meter Peaks. Seattle. pp. pp.72-73.CS1 maint: extra text (link)