परमहंस योगानंद

परमहंस योगानंद
rahmenlos
rahmenlos

परमहंस योगानंद (जानेवारी ५, इ.स. १८९३ - मार्च ७, इ.स. १९५२) (जन्मनाव मुकुंदलाल घोष) हे भारतीय योगी आणि गुरू होते. ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी (मराठी भाषांतर योगी कथामृत) या आपल्या पुस्तकाद्वारे अनेक पाश्चात्य व्यक्तींना त्यांनी ध्यानाच्या पद्धती आणि क्रिया योग यांचा परिचय घडविला. आपल्या शिकवणुकीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आत्म-प्राप्ती फेलोशिप / योगदा सत्संग समाज यांची स्थापना केली.

जीवन

उत्तर प्रदेशातील गोरखपूर इथे एका धर्मशील कुटुंबात योगानंदांचा जन्म झाला. सानंद या त्यांच्या धाकट्या भावाच्या म्हणण्यानुसार बाल मुकुंदाची अध्यात्माची जाणीव व अनुभव असामान्य होते. आपली आध्यात्मिक तहान भागविण्यासाठी त्यांनी अनेक हिंदू साधू आणि संतांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. इ. स. १९१० मध्ये, वयाच्या सतराव्या वर्षी, स्वामी युक्तेश्वर गिरी यांची भेट झाल्यानंतर योगानंदांचा शोध जवळजवळ थांबला. नंतर युक्तेश्वरांनी योगानंदांना सांगितले की महावतार बाबाजी यांनी एका खास कारणासाठी त्यांना पाठविले आहे.