पाञ्चजन्य (साप्ताहिक)
पाञ्चजन्य हे एक हिंदी भाषेतले साप्ताहिक प्रकाशन आहे. याचा उल्लेख पाञ्चजन्य आणि पांचजन्य असाही केलेला आढळतो. हे भारत राष्ट्रवादी आणि भारताच्या हीताची बाजू मांडणारे प्रकाशन आहे असे दिसून येते. देशातील राष्ट्रवादाची भावना बळकट करण्यात पंचजन्य पत्रिकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.[१] या प्रकाशनाने भारतीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या भारत विषयक बाबींवर आवाज उठवले आहेत. १९५९ मध्ये कम्युनिस्ट चीनकडून तिबेटच्या स्वातंत्र्याचे अपहरण आणि दलाई लामांची हकालपट्टी, १९६२ मध्ये भारतावर चीनने केलेल्या हल्ल्यासाठी नेहरूंचे अयशस्वी परराष्ट्र धोरण आणि संरक्षण धोरण, १९७२ मध्ये भारतीय सैन्याचा विजय सिमला करार असे अनेक विषय पांचजन्य या साप्ताहिकाने हाताळले आहेत असे दिसते.
स्थापना
पांचजन्य असे प्रकाशन असावे ही कल्पना प्रथम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडली होती. स्वातंत्रपूर्वकाळात हस्तलिखिताने या प्रकाशनाची सुरुवात झाली. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे साप्ताहिक युवा वर्गाला प्रोत्साहीत करत असे. १४ जानेवारी १९४७ रोजी मकर संक्रांतीच्या पवित्र सणाच्या दिवशी याची स्थापना झाली.[२] पहिल्या अंकाच्या मुखपृष्ठावर, भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून शंख वाजविला जातो आहे असे चित्र होते. श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या संपादनाखाली, 'पाञ्चजन्य' साप्ताहिकाने सुरुवाते केली.
उद्देश
देशद्रोही शक्तींचा पर्दाफाश करून भारताचा सांस्कृतिक वारसा जपणे हा पाञ्चजन्यचा उद्देश आहे.[३]
स्वरूप
अर्थकारण, शिक्षणविश्व, स्त्रीजगत, युवाविश्व, राष्ट्रीय विचार, समकालीन, इतिहासाच्या नजरेतून चित्रपटसमीक्षा, साहित्य समीक्षा, संस्कृती-सत्य असे अनेक विषय या साप्ताहिकातून हाताळले जातात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सप्टेंबर २०२१ मध्ये, इन्फोसिसने विकसित केलेल्या GST टॅक्स पोर्टलमधील त्रुटींवर टीका करणारी चार पानांची कव्हर स्टोरी केली होती साख और समस्या (प्रतिष्ठा आणि नुकसान), कव्हर पेजवर तिचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे चित्र होते. या लेखामुळे भारतीय राजकारण आणि आयटी उद्योगात बराच वाद झाला. त्या नंतर पांचजन्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र नाही असा निर्वाळा दिला गेला आहे.[४]
हे ही पाहा
साप्ताहिकाचा बाह्यदुवा
संदर्भ
संदर्भांची झलक दाखवा
- ^ "कृष्ण गोपाल बोले: लंबी दूरी तय कर चुकी है आरएसएस की राष्ट्रीय अखंडता और एकता की परियोजना, पांचजन्य के कार्यों को सराहा". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-03-15 रोजी पाहिले.
- ^ "राष्ट्रीय स्वयं सेवक संघ द्वारा पांचजन्य पुस्तिका का हुआ विमोचन". swatantraprabhat.com (हिंदी भाषेत). 2022-01-06. 2022-01-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-15 रोजी पाहिले.
- ^ "आरएसएस ने किया पांचजन्य उत्तर प्रदेश विशेष अंक का विमोचन". Dainik Jagran (हिंदी भाषेत). 2022-03-15 रोजी पाहिले.
- ^ Phadnis, Aditi (2021-09-06). "RSS distances itself from 'Panchajanya' article targeting Infosys".