फ्रेड (फुटबॉल खेळाडू)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/b/ba/Fred_Silver_Boot%2C_Confederations_Cup_2013.jpg/250px-Fred_Silver_Boot%2C_Confederations_Cup_2013.jpg)
फ्रेदेरिको चावेझ ग्वेदेझ उर्फ फ्रेड (पोर्तुगीज: Frederico Chaves Guedes; ३ ऑक्टोबर, १९८३ ) हा एक ब्राझीलीयन फुटबॉलपटू आहे. २००५ पासून ब्राझील राष्ट्रीय संघाचा भाग असलेला फ्रेड २०१० व २०१४ फिफा विश्वचषक, २००७ व २०११ कोपा आमेरिका तसेच २०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांमध्ये ब्राझीलकडून खेळला आहे. क्लब पातळीवर फ्रेड २००५-०९ दरम्यान फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक ल्यों तर २००९ पासून ब्राझीलमधील फ्लुमिनेन्स ह्या क्लबांसाठी खेळत आहे.