भारत-लाओस संबंध
bilateral relations between India and Laos | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | bilateral relation | ||
---|---|---|---|
स्थान | भारत, लाओस | ||
| |||
भारत-लाओस संबंध हे आशियाई देश भारत आणि लाओसमधील द्विपक्षीय संबंध आहेत. फेब्रुवारी १९५६ मध्ये दोन राष्ट्रांमधील संबंध प्रस्थापित झाले. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५४ मध्ये तर भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी १९५६ मध्ये लाओसला भेट दिली.[१][२] दक्षिण चीन समुद्रात चीनच्या वाढत्या भू-पुनर्प्राप्तीच्या क्रियाकलापांच्या अनुषंगाने भारत लाओसला सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानतो.[३] संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य होण्याच्या भारताच्या प्रयत्नांना लाओसने पाठिंबा दिला आहे.[४]
द्विपक्षीय भेटी
द्विपक्षीय संबंध प्रस्थापित झाल्यापासून भारत आणि लाओसमध्ये अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय भेटी झाल्या आहेत. भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये भेट दिली जिथे त्यांनी ५ त्वरित प्रभाव प्रकल्पांवर स्वाक्षरी केली.[३][५] त्यानंतर भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी २००४ मध्ये १० व्या आसियान शिखर परिषदेसाठी लाओसला भेट दिली जिथे त्यांनी लाओसचे पंतप्रधान बौनहांग व्होराचिट यांची भेट घेतली, त्यांच्यामध्ये तिसऱ्या भारत-आसियान शिखर परिषदेबाबत करार करण्यात आले.[६] भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी २००२ मध्ये लाओसला भेट दिली होती. भारताच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी २०१० मध्ये लाओसला भेट दिली होती.
लाओसच्या देखील भारतात उच्चस्तरीय भेटी झाल्या आहेत, प्रिन्स सूफानोवोंग, जे लाओसचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते त्यांनी १९७५ मध्ये भारताला भेट दिली. अलीकडच्या काळात लाओसच्या पंतप्रधान चौमाली सायासोने २००८ मध्ये भारताला भेट दिली होती. इतर अनेक परराष्ट्र मंत्री आणि सचिव स्तरावरील भेटी ह्या दोन देशात झाल्या आहेत.[१] [४]
धोरणात्मक संबंध
२००८ मध्ये लाओसचे अध्यक्ष चौमाली सायासोन यांच्या ३ दिवसीय भारत भेटीवर, भारताने लाओसमध्ये "एर फोर्स अकादमी" स्थापन करण्याचा निर्णय घेतला. २००९ मध्ये भारताने "लाओस डिफेन्स फोर्सेस" ला ६० व्या वर्धापनदिनानिमित्त ५० पॅराशूट भेट दिले.[७] [८]
आर्थिक संबंध
२०१३ मध्ये ७ व्या इंडिया-लाओस जॉइंट कमिशन मीटिंग मध्ये भारताने लाओसला सिंचन आणि जलविद्युत प्रकल्पांसाठी $६६.१५ दशलक्ष देणगी देण्याचे मान्य केले.[९]
धातू, खनिजे, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औषधे आणि लाकूड ही दोन राष्ट्रांमधील मुख्य उत्पादने आहेत. २००८-०९ मध्ये दोन राष्ट्रांमधील द्विपक्षीय व्यापार फक्त $९.५२ दशलक्ष होता जो २००९-१० मध्ये वेगाने वाढला व $३७ दशलक्ष झाला. तथापि २०१०-११ मध्ये व्यापार पुन्हा $१३.३३ दशलक्षसह कमी झाला. तेव्हापासून २०१२-१३ मध्ये व्यापार पुन्हा वेगाने $१६७.४९ दशलक्ष इतका वाढला.[१][१०]
संदर्भ
- ^ a b c "PDR: Brief on India – Laos Bilateral Relations". The Embassy of India, Vientiane, LAO. 2020-07-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ Damodar Ramaji Sar Desai (1965). India's Relations with Vietnam, Laos, and Cambodia: 1954–1961. University of California.
- ^ a b IANS (August 11, 2015). "India shoring up ties with Asean: Hamid Ansari to visit three countries". Times of India. 2015-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ a b "Pratibha Patil embarks on visit to Laos and Cambodia". 2010-09-09. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Vice President Hamid Ansari Embarks on Visit to Cambodia, Laos". एनडीटीव्ही. 2015-09-15. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Prime Minister Manmohan Singh's Laos visis". 2004-11-29. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ "India to set up Air Force Academy in Laos". 2008-08-30. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Suryakiran team dazzles at 13th anniversary airshow". Deccan Herald. 2009-05-23. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ PTI (9 September 2013). "India agrees to provide $66.15 million to Laos". 2016-06-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-11-01 रोजी पाहिले.
- ^ "Lao PDR" (PDF). July 2, 2014 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. November 1, 2015 रोजी पाहिले.