भोपाळ मेट्रो

भोपाळ मेट्रो
मार्ग लांबी कि.मी.

भोपाळ मेट्रो (भोज मेट्रो म्हणूनही ओळखली जाते) [] [] [] ही भारतातील मध्य प्रदेश राज्याची राजधानी असलेल्या भोपाळ शहराला सेवा देण्याच्या उद्देशाने निर्माणाधीन जलद परिवहन प्रणाली आहे. [] या प्रणालीमध्ये एकूण १०४.८७ किलोमीटर (६५.१६ मैल) लांब ६ मार्गांचे जाळे असणार आहे. [] भोपाळ मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात २८ किमी (१७.४० मैल) लांबीच्या मार्ग क्रमांक २ आणि ५ वर बांधकाम चालू आहे. [] या प्रकल्पासाठी अंदाजे  ८० billion (US$१.७८ अब्ज) चा खर्च होणार आहे. [] या मार्गिका रस्त्यावर, पुलांवर आणि काही ठिकाणी भूमिगत असतील. []

पार्श्वभूमी

भोपाळमधील नियोजित मेट्रो ही अवजड मेट्रो प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये १५५ किमी लांबीचे जाळे आहे. मे २०१३ मध्ये या जलद परिवहनाच्या साधनासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी वास्तुशास्रज्ञ रोहित गुप्ता (रोहित अससोसिएट्स सीटीएस अँड रेल्स प्रायव्हेट लिमिटेड) या सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली होती. अनेक निकषांच्या विश्लेषणावर आणि सल्लागारांच्या शिफारशींवर आधारित, मध्य प्रदेश सरकारने ३० जून २०१४ रोजी सल्लागारांने तयार केलेल्या अहवालास मान्यता दिली. २ डिसेंबर २०१४ पर्यंत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी भू-तांत्रिक सर्वेक्षण आणि कंपनीच्या स्थापनेचे काम सुरू झाले. हा प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होण्याचे सांगितले होते आणि २०१९ मध्ये पहिला टप्पा सुरू होणार असे अपेक्षित होते. डिसेंबर २०२४ प्रयन्त या प्रकल्पचे काम पूर्ण झाले नसून, पहिल्या टप्प्याचे काम संपविण्याची नवीन तारीख २०२७ सांगितल्या गेली.[]

१ मे २०१९ रोजी, आशियाई विकास बँकेने भोपाळ मेट्रो प्रकल्पासाठी निधी देण्यास तत्वतः मान्यता दिली. कर्जासाठी केंद्र सरकार हमीदार म्हणून उभे राहील. [१०]

जाळे

पहिला टप्पा

पहिल्या टप्प्यात, भोपाळ मेट्रोमध्ये २ मार्ग आणि २८ स्थानके असतील. [११]

ओळीचे नाव टर्मिनल्स लांबी स्थानके
केशरी मार्गिका करोंड चौक एम्स १४.९९ किमी १६
निळी मार्गिका भडभदा चौक रत्‍नागिरी तिराहा १२.९१ किमी १३
एकूण २७.९० किमी २९
भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्प, खांबांचे बांधकाम
बांधकामाधीन राणी कमलापती मेट्रो स्थानक

हे देखील पहा

संदर्भ

  1. ^ "Bhopal Metro to be named after Raja Bhoj, announces Kamal Nath". Mint (इंग्रजी भाषेत). 26 September 2019. 9 November 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Bhopal Metro To Be Called "Bhoj Metro" After Indian King "Raja Bhoj": Kamal Nath". NDTV.com. 9 November 2019 रोजी पाहिले.
  3. ^ "Kamal Nath names Bhopal Metro after Raja Bhoj; BJP cheers | Bhopal News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 27 September 2019. 9 November 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Proposed survey for Bhopal metro rail a right step: E Sreedharan – India – DNA". Dnaindia.com. 21 July 2010. 24 January 2011 रोजी पाहिले.
  5. ^ "DMRC surveys Bhopal for metro rail service". Hindustan Times. 20 April 2010. 24 January 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Bhopal Metro – Information, Route Maps, Fares, Tenders & Updates". The Metro Rail Guy. 10 September 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Bhopal, Indore to have Metro Rail soon". Thaindian.com. 5 March 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 24 January 2011 रोजी पाहिले.
  8. ^ "Bhopal Metro – Route Map, Stations List, Progress, And Latest Updates - Infra Info Hub" (इंग्रजी भाषेत). 2024-07-12. 2024-07-15 रोजी पाहिले.
  9. ^ संगोई, विधी (२३ डिसेंबर २०२४). "Bhopal Metro: Phase 1 to become fully operational by 2027". Prop News Time. २४ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  10. ^ "ADB to fund Delhi-Meerut rapid rail link, 4 metro projects". Hindu Business Line (इंग्रजी भाषेत). 4 May 2019 रोजी पाहिले.
  11. ^ "Bhopal Metro – Information, Route Maps, Fares, Tenders & Updates". The Metro Rail Guy (इंग्रजी भाषेत). 2 May 2020 रोजी पाहिले.

35. भोपाळ मेट्रो: भोपाल मध्ये 2 रूट वर लवकर मेट्रो धावणे की तयार आहे... तिसरा मार्ग का खाका तयार, 16.70 किमी का बनगा नवीन ट्रॅक

बाह्य दुवे