मजबूर (हिंदी चित्रपट)
मजबूर हा १९७४ साली प्रदर्शित झालेला हिंदी-भाषेतील रवी टंडन दिग्दर्शित चित्रपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, परवीन बाबी, प्राण व सत्येन कप्पू यांनी प्रमुख भूमिकेत काम केले आहे.
मजबूर | |
---|---|
दिग्दर्शन | रवी टंडन |
निर्मिती | प्रेमजी |
प्रमुख कलाकार |
अमिताभ बच्चन परवीन बाबी प्राण सत्येन कप्पू फरीदा जलाल सुलोचना लाटकर जगदीश राज इफ़तेखार |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १९७४ |
पार्श्वभूमी
कलाकार
- अमिताभ बच्चन - रवी खन्ना
- परवीन बाबी - नीला राजवांश
- प्राण - मायकल डिसोझा
- सत्येन कप्पू - नरेंद्र सिन्हा
- इफ़तेखार - सीआयडी इन्स्पेक्टर खुराना
- जगदीश राज - इन्स्पेक्टर कुलकर्णी
- फरीदा जलाल - रेणू खन्ना
- सुलोचना लाटकर - श्रीमती. खन्ना
- रेहमान - सुरेंद्र सिन्हा
- शिव कुमार - राणे
- डी.के. सपरु - श्री. राजवांश
- अलंकार जोशी - बिल्लू खन्ना
- मॅक मोहन - प्रकाश
- मदन पुरी - महीपत राई
- आशू - मोना सिन्हा
- सुधीर - रवीचा सहकारी
- पिंचू कपूर - डॉक्टर
कथानक
रवी खन्ना (अमिताभ बच्चन) नावाच्या एक माध्यमवर्गीय ट्रॅव्हल एजन्ट असतो तो आपली वृद्ध आई (सुलोचना लाटकर), चालता येत नसलेली बहीण (फरीदा जलाल) व शाळेत जाणारा भाऊ ह्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याला हे कळून धक्का बसतो की त्याच्या मेंदूत वाढणारा ब्रेन ट्यूमर असून त्याला जगायला फक्त सहा महिने आहेत. त्याच्या कुटुंबाची परिस्थिती सुधारण्यासाठी रवी त्यानी न केलेल्या खुनात स्वतःला अडकवतो म्हणजे त्याच्या कुटुंबाला बक्षिसाचे पाच लाख रुपये मिळतील. खुनाचे तपासकर्ते सीआईडी इन्स्पेक्टर खुराना (इफ़तेखार) व इन्स्पेक्टर कुलकर्णी (जगदीश राज) हे रवीला अटक करतात आणि कोर्टात रवीला फाशीची शिक्षा सुनावली जाते. तुरुंगात असताना त्याला मोठा ट्यूमर अटॅक येतो व त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. तिथे रवीचं ऑपरेशन करून त्याच्या मेंदूतला ट्यूमर बाहेर काढतात. परंतु, आता खूप उशीर झालेला आहे कारण रवी कोर्टात खूनी म्हणुन दोषी ठरलेला आहे. स्वतःला फाशीच्या शिक्षेपासून वाचण्यासाठी रवी हॉस्पिटलमधून पळून जातो व त्याची प्रेयसी नीला (परवीन बाबी) हिच्यासोबत खऱ्या खुनीच्या शोधात निघतो. रवीची मायकल डिसोझा (प्राण) नावाच्या एका चोराशी गाठ पडते. खऱ्या खुनीला पाहिलेला मायकल रवीला त्याला शोधण्यात मदत करायचं वचन देतो. शेवटी असं उघडकीस होतं की ज्याचा खून झालेला आहे त्याचाच भाऊ नरेंद्र सिन्हा (सत्येन कप्पू) हा त्याचा खुनी आहे.