महामुद्रा

महामुद्रा तथा श्रेष्ठ मुद्रा किंवा श्रेष्ठ प्रतीक ही बौद्ध धर्मातील संकल्पना आहे. महामुद्रेची जाणीव झालेली व्यक्ती ज्या प्रकारे वास्तवाचा अनुभव घेते त्यास महामुद्रा असे म्हणतात. मुद्रा या संज्ञेने प्रत्येक बाब किंवा आविष्कार स्पष्टपणे दिसते याचा निर्देश होतो तर महा ही संज्ञा अशी बाब संकल्पनेच्या, कल्पनेच्या आणि प्रक्षेपणाच्या पलीकडील असल्याच्या तथ्याकडे लक्ष वेधते.

महामुद्रा तिबेटी बौद्धमताच्या नव्या शाखांमधील सगळ्या आचारांच्या शिकवणीचेही प्रतिनिधित्व करते. महामुद्रा हा बौद्धमताच्या सर्व पवित्र ग्रंथांचा सारभूत संदेश आहे असे तिबेटी बौद्धमतात मानले जाते.