यशवंतराव होळकर
होळकर साम्राज्याचे महाराजा | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
जन्म तारीख | डिसेंबर ३, इ.स. १७७६ माळवा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | ऑक्टोबर २७, इ.स. १८११ Bhanpura | ||
व्यवसाय |
| ||
कुटुंब | |||
वडील |
| ||
अपत्य |
| ||
| |||
![]() |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/a/ab/Yashwantrao_Holkar_seated.jpg/220px-Yashwantrao_Holkar_seated.jpg)
यशवंतराव होळकर (प्रथम) (३ डिसेंबर १७७६, वाफगाव - २८ ऑक्टोबर, १८११, भानपुरा, मध्यप्रदेश), हे होळकर साम्राज्याचे महाराजा होते. मध्य प्रदेशातील महेश्वर येथे 6 जानेवारी 1805 साली राज्याभिषेक करून त्यांनी होळकर मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि ते पहिले महाराजा झाले.काशीराव, मल्हारराव व विठोजीराव हे त्यांचे थोरले बंधू. यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला. यशंवत महाराज सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला,इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होतें. संपूर्ण भारतभर इंग्रजांविरुद्ध युद्ध करण्याची योजना त्यांनी तयार केली होती. परंतु ह्या प्रक्रियेत अनेक मराठा सरदारांनी दगा फटका केल्याने योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या मुळेच मराठा साम्राज्य ब्रिटिश साम्रज्यात विलीन होणार शेवटचं मोठं राज्य होत.
पुस्तक
- 'ॲड.विजयकुमार दुधभाते किल्लारीकर'
- 'झुंज', लेखक:ना सं इनामदार
- 'महाराजा यशवंतराव होळकर', लेखक : संजय सोनवणी
- 'श्रीमन्महाराज यशवंतराव होळकर : मराठेशाहीअखेरचा अद्वितीय स्वातंत्र्यवीर, लेखक : नरहर रघुनाथ फाटक