येशू ख्रिस्त

येशू ख्रिस्त
जन्म इ.स. ४
बेथलेहेम
मृत्यू इ.स. ३०
जेरुसलेम
मृत्यूचे कारण वधस्तंभ किंवा क्रूसावर चढवले
प्रसिद्ध कामे मृतांना जीवंत करणे, रोग्यांना बरे करणे, आंधळ्यांना दृष्टी देणे, मानवजातीचा पापांसाठी मरणे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जीवंत होणे आणि स्वर्गात जाणे
मूळ गाव नाझारेथ
पदवी हुद्दा परमेश्वराचा पुत्र (जगाचा तारणहार)
वडील जोसेफ
आई मारिया

येशू ख्रिस्त (इंग्रजी: Jesus Christ किंवा Jesus of Nazareth ; हिब्रू: יֵשׁוּעַ yēšūă किंवा Yeshua); (इ.स.पू. ४ ते इ.स. ३० अंदाजे) हा ख्रिस्ती धर्माच्या केंद्रस्थानी आहे. ख्रिस्‍ती धर्मग्रंथातील (बायबलमधील) नवा करार नामक उपग्रंथ येशूच्‍या जन्मासंबंधी, तसेच त्‍याचे जीवन, कार्य, शिकवण या विषयांशी संबंधित आहे. बायबल हा ग्रंथ ख्रिस्ती धर्माचा ग्रंथ आहे. त्‍याला मरियम पुत्र, नासरेथ गावाचा येशू, प्रभू येशू, ख्रिस्त, जीजस क्राइस्ट, यीशु किंवा ईसा मसीह असेही म्‍हटले जाते.

पहिल्या शतकातील यहुदी (ज्यू )धर्मोपदेशक आणि धार्मिक नेते होते. तो जगातील सर्वात मोठा धर्म असलेल्या ख्रिश्चन धर्माची मध्यवर्ती व्यक्ती आहे. बहुतेक ख्रिश्चनांचा असा विश्वास आहे की तो देव पुत्राचा अवतार आहे आणि हिब्रू बायबलमध्ये भाकीत केलेला मशीहा (ख्रिस्त) आहे.[]

नावाचा अर्थ

मत्‍तयरचित शुभवर्तमानाच्या पुस्‍तकातल्या पहिल्या अध्‍यायातले २१ वे पद येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दल सांगते की,

तिला पुत्र होईल आणि तू त्‍याचे नाव येशू ठेव कारण तो आपल्‍या लोकांना त्‍यांच्‍या पापांपासून तारील. (मत्तयः१:२१)

येशू ख्रिस्ताला, 'इब्री' (हिब्रू) भाषेत 'येशुआ'[] तर ग्रीक भाषेत 'येसूस' Ιησούς (Iēsoûs) असे म्हणले आहे येशू हे याच शब्‍दाचे मराठी रूपांतर आहे, या नावाचा अर्थ तारणारा असा होतो, येशू सर्व मानवजातीला पापांच्‍या बंधनातून सोडविण्‍याकरिता आला, असे (पवित्र शास्त्र =बायबल) सांगते. या येशूला तत्कालीन राजसत्तेने क्रूसावर चढवून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. येशूच्या केवळ नावाद्वारे पापातून मुक्ती मिळत आहे. (प्र‍ेषित(?). ४.१२)

ख्रिस्त हा शब्‍द ग्रीक भाषेतील ख्रिस्‍तोस (Χριστός, Christós अभिषिक्त एक) या शब्‍दावरून आलेला असून त्‍याचा अर्थ अभिषिक्‍त असा होतो. यहुदी लोकांना (ज्यू धर्मीयांना) याव्‍हे (यहोवा) नावाच्या देवाकडून मानवाला पापांपासून तारण्यासाठी ख्रिस्ताचा जन्म होईल असे आश्वासन प्राप्‍त झाले होते, असे समजले जाते. तरीसुद्धा त्या येशूचा यहूदी लोकांनी स्‍वीकार केला नाही, देवाने येशूला अभिषेक करून विशेष कार्यासाठी निवडून, पृथ्वीवर पाठविण्‍यात आले होते, अशी ख्रिस्ती लोकांची श्रद्धा आहे.

जन्म

येशू ख्रिस्ताचा जन्म नक्की कोणत्या दिवशी किंवा कोणत्या महिन्यात झाला, हे इतिहासात कुठेच नमूद केलेले नाही. तरी नवीन करारातील लूककृत शुभवर्तमान ह्या पुस्तकात यहुदी कॅलेंडर प्रमाणे सहाव्या महिन्यात (सध्याच्या कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट-सप्टेंबर) मरियेला देवदूताने तिच्या पोटी येशू जन्म घेणार असल्याचा देवाचा निरोप दिल्याची नोंद आहे. असे असले तरी, दर वर्षी २५ डिसेंबर हा ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ म्हणून पाळला जातो.

मृत्यू

येशू ख्रिस्त

येशूचा मृत्यू वयाच्या ३०-३३ वर्षाच्या सुमारास झाला आहे, असे बायबलमध्ये नमूद केले आहे. त्याला वधस्तंभ किंवा क्रूसावर खिळून ठार करण्यात आले.

दृष्टिकोन

त्याच्या स्वतःच्या शिष्यांशिवाय आणि अनुयायांच्या व्यतिरिक्त, येशूच्या काळातील यहुद्यांनी सामान्यतः त्याला मशीहा म्हणून नाकारले, जसे की आजच्या मोठ्या बहुसंख्य यहुदी करतात. ख्रिस्ती धर्मशास्त्रज्ञ, सार्वभौमिक परिषद, सुधारक आणि इतरांनी शतकानुशतके येशूबद्दल विस्तृतपणे लिहिले आहे. ख्रिश्चन पंथ आणि मतभेदांची व्याख्या अनेकदा त्यांच्या येशूच्या वर्णनाद्वारे केली गेली आहे. दरम्यान, मॅनिचियन, नोस्टिक्स, मुस्लिम, द्रुझ, बाहाई धर्म आणि इतरांना त्यांच्या धर्मांमध्ये येशूसाठी प्रमुख स्थाने सापडली आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ यादी

  1. ^ https://en.wikipedia.org/wiki/Jesus
  2. ^ "यीशु". विकिपीडिया (हिंदी भाषेत). 2020-01-05.

बाह्य दुवा