राहुरी विधानसभा मतदारसंघ - २२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते.

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजी भानुदास कर्डीले यांनी 91 हजार 454 एवढी मते घेत विजय मिळवला. राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे डॉ. उषा तनपुरे होते. त्यांना 65 हजार 778 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव झाला. राहुरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराजे गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अमोल जाधव आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोविंद मोकाटे होते.