रिमी सेन

रिमी सेन
रिमी सेन
जन्म रिमी सेन
२१ सप्टेंबर, इ.स. १९८१
कोलकाता, पश्चिम बंगाल
इतर नावे शुभोमित्रा सेन
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
भाषा बंगाली (मातृभाषा, अभिनय)
हिंदी, तेलुगू (अभिनय)

रिमी सेन (बंगाली: রিমি সেন; रोमन लिपी: Rimi Sen ), जन्मनाव शुभोमित्रा सेन, (२१ सप्टेंबर, इ.स. १९८१; कोलकाता, पश्चिम बंगाल - हयात) ही बंगाली अभिनेत्री व मॉडेल आहे. हिने बंगाली, हिंदी, तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे.

जीवन

रिमी सेन हिचे मूळ नाव शुभोमित्रा सेन असून तिचा जन्म कोलकाता येथे झाला. बिद्या भारती गर्ल्स् हायस्कूल येथून तिने इ.स. १९९८मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले. कलकत्ता विद्यापीठातून तिने वाणिज्य शाखेत पदवी मिळवली.

कारकीर्द

रिमी सेन हिने इ.स. १९९६ सालच्या दामू या बंगाली चित्रपटाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. अभिनयाची आवड असल्याने ती मुंबई येथे आली. तेव्हा तिला जाहिरातींत कामे मिळाली. त्यानंतर इ.स. २००१ व इ.स. २००२ साली तिचे दोन तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाले. इ.स. २००३सालच्या हंगामा चित्रपटाद्वारे तिने पहिल्यांदा हिंदी चित्रपटात अभिनय केला. या विनोदप्रधान चित्रपटात तिच्यासह अक्षय खन्ना, आफताब शिवदासानी इत्यादी कलाकार होते. याव्यतिरिक्त तिने धूम, गोलमाल इत्यादी गाजलेल्या चित्रपटांत कामे केली आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत