लील

लील
Lille
फ्रान्समधील शहर


चिन्ह
लील is located in फ्रान्स
लील
लील
लीलचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 50°38′14″N 3°03′48″E / 50.63722°N 3.06333°E / 50.63722; 3.06333

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश नोर-पा-द-कॅले
विभाग नोर
क्षेत्रफळ ३९.५१ चौ. किमी (१५.२५ चौ. मैल)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर २,२६,८२७
  - घनता ६,५२१ /चौ. किमी (१६,८९० /चौ. मैल)
  - महानगर ११,५०,५३०
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.mairie-lille.fr/en


लील (फ्रेंच: Lille) हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर व नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाची तसेच नोर ह्या विभागाची राजधानी आहे. लील हे फ्रान्समधील चौथे मोठे महानगर (पॅरिस, ल्योंमार्सेल खालोखाल) आहे. लील शहर पॅरिसच्या ईशान्येस २२० किमी अंतरावर तर ब्रसेल्सच्या पश्चिमेस ११२ किमी अंतरावर स्थित आहे.

अनेक शतकांचा इतिहास असलेले व फ्रान्सच्या सांस्कृतिक पटलावर मानाचे स्थान असलेल्या लीलची २००४ साली युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड करण्यात आली होती.


वाहतूक

युरोपाच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला एका तर युरोस्टारद्वारे लंडनला १:२० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी लीलमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.

खेळ

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा लील ओ.एस.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.

आंतरराष्ट्रीय संबंध

जगातील खालील शहरांसोबत लीलचे सांस्कृतिक संबंध आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: