वसुंधरा दिन

पृथ्वी दिनासाठी जॉन मक्डॉनेल याने बनवलेला अनधिकृत ध्वज

पृथ्वी दिन हा पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी जागृती करण्यासाठी हा दिवस जगभर पाळण्यात येतो. आपली पृथ्वी ही सुमारे ४.५० अब्ज वर्षांपूर्वी तयार झाली. अमेरिकेत २२ एप्रिल रोजी हा दिन पाळला जातो, तर संयुक्त राष्ट्रे २० मार्च रोजी, म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी, संपातबिंदू पॄथ्वी दिन पाळतात.

पर्यावरणरक्षणाची शिकवण देण्याच्या हेतूने अमेरिकेचा सेनेटर गेलॉर्ड नेल्सन याने २२ एप्रिल, इ.स. १९७० रोजी पहिल्यांदा पृथ्वी दिनाचे आयोजन केले. पहिला पृथ्वी दिन अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे पाळला गेला, तरीही त्या कार्यक्रमाचा राष्ट्रीय समन्वयक असलेला डेनिस हेस याने स्थापलेल्या संस्थेने इ.स. १९९० साली १४१ देशांमध्ये या दिवसाचे आयोजन करून पृथ्वी दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. सध्या अर्थ डे नेटवर्क या संस्थेच्या समन्वयाने १७५ देशांमधून हा दिवस साजरा केला जातो. इ.स. २००९ साली संयुक्त राष्ट्रांनी २२ एप्रिल हा दिवस आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली.


पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाचे

  • वृक्षारोपण करावे आणि वृक्षतोड कमी करावी.
  • नद्याचे जल स्वछ ठेवणे
  • आपल्या सभोवतालच्या पर्यावरणात स्वच्छता राखणे.
  • शेतीत जैविक खतांचा वापर करा, रासायनिक खाते कमी वापर.

बाह्य दुवे