वारंगळ
वारंगल వరంగల్ |
|
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | तेलंगण |
जिल्हा | वरंगळ जिल्हा |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९९१ फूट (३०२ मी) |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | ८,११,८४४ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
वरंगल (किंवा वारंगल / वारंगळ - Warangal) हे भारताच्या तेलंगणा राज्याच्या वरंगल जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. येथील पुरातत्त्वीय अवशेषांसाठी प्रसिद्ध असलेले वरंगळ शहर तेलंगणाच्या उत्तर भागात वसले असून ते हैदराबादच्या १४० किमी ईशान्येस आहे. २०११ साली ८.११ लाख लोकसंख्या असलेले वरंगळ हैदराबादखालोखाल राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते.वारंगळ ही काकत्य राजवटीची राजधानी होती. हैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत (१९४९) हा प्रदेश असफझाई निजामांच्या अखत्यारीत होता.[१]
वरंगळ येथील राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्थान ही एक प्रमुख शैक्षणिक संस्था असून काकतीय विद्यापीठ हे येथील प्रसिद्ध विश्वविद्यालय आहे.
लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार, शहराची लोकसंख्या ६,१५,९९८ होती. एकूण लोकसंख्येमध्ये ३०८,५०९ पुरुष आणि ३०७,४८९ स्त्रिया आहेत. वारंगळ शहराची लोकसंख्या ६१५,९९८ असली तरी; त्याची शहरी/महानगरी लोकसंख्या ७५३,४३८ आहे ज्यापैकी ३७७,९४३ पुरुष आणि ३७५,४९५ महिला आहेत. लिंग गुणोत्तर १,००० पुरुषांमागे ९९७ स्त्रिया. ०-६ वर्षे वयोगटातील ५९,१९५ मुले आहेत, त्यात ३०,३८० मुले तर 2८,८१५ मुली होत्या, ०-६ वर्षे वयोगटातील लिंग गुणोत्तर १,००० मुलेमागे ९४८ मुली आहे. ४,६३,८०१ साक्षरांसह सरासरी साक्षरता दर ८३.३०% होता.
८३.४१% लोक हिंदू आणि (१४.३९%) मुस्लिम होते. इतर धार्मिक अल्पसंख्याकांमध्ये ख्रिश्चन (१.६५ %), शीख (०.१५%), बौद्ध (०.०१%), जैन (०.०३%) आणि कोणताही धर्म नसलेले (०.३५ %) यांचा समावेश होतो.[३]
तेलुगू वरंगलमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.
वाहतूक
हे शहर रस्ते आणि रेल्वे मार्गांनी प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग हे, राष्ट्रीय महामार्ग १६३, हैदराबाद आणि भोपालपट्टणमला जोडणारा; रामागुंडम आणि खम्मम यांना जोडणारा NH ५६३ आहेत. वरंगल येथे TSRTC (तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ) हे सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरवते.[४][५]
वारंगलमध्ये भारतीय रेल्वेच्या महत्त्वाच्या नवी दिल्ली-चेन्नई मुख्य मार्गावर काझीपेट आणि वारंगल ही दोन रेल्वे स्थानके आहेत. ती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या सिकंदराबाद रेल्वे विभागाच्या अखत्यारीमध्ये येतात.[६]
वरंगलमध्ये निजामांनी १९३० मध्ये ममनूर येथे विमानतळ बांधले आहे. १,८७५ एकर जमीन, ६.६ किमी धावपट्टी, पायलट आणि स्टाफ क्वार्टर, पायलट प्रशिक्षण केंद्र आणि एकापेक्षा जास्त टर्मिनल असलेले हे अविभाजित भारतातील सर्वात मोठे विमानतळ होते. परंतु आजच्या घडीला तेथे प्रवासी सेवा उपलब्ध नाही.[७]
शिक्षण
विद्यापीठे आणि महाविद्यालये
- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, वारंगल
- राष्ट्रीय प्राद्योगिकी संस्थान, वारंगल (एन.आय.टी. वारंगल)
- काळोजी नारायण राव आरोग्य विज्ञान विद्यापीठ
- काकतिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स
- काकतिया मेडिकल कॉलेज
- काकतिया विद्यापीठ
- एसआर अभियांत्रिकी महाविद्यालय
- एसआर विद्यापीठ
- वागदेवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
- वागदेवी अभियांत्रिकी महाविद्यालय
शाळा
- दिल्ली पब्लिक स्कूल, वारंगल
- नागार्जुना हायस्कूल
- प्लॅटिनम ज्युबिली हायस्कूल
- दक्षिण मध्य रेलवे मिक्सड हाई स्कूल (ई.एम.), काजीपेटी
- श्रीनिवास रामानुजन कन्सेप्ट स्कूल
- सेंट गॅब्रिएल हायस्कूल
- सेंट पीटर्स सेंट्रल पब्लिक स्कूल
- थापर विद्या विहार
बाह्य दुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ "वरंगळ". ३१ जुलै २०१४ रोजी पाहिले.
- ^ "Warangal City Population Census 2011 – Andhra Pradesh".
- ^ "Warangal City Population Census 2011-2022 | Andhra Pradesh". www.census2011.co.in. 2022-02-16 रोजी पाहिले.
- ^ Sep 29, TNN / Updated:; 2014; Ist, 03:00. "Guntur still awaits city RTC services | Hyderabad News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "TSRTC". www.tsrtc.telangana.gov.in. 2022-02-11 रोजी पाहिले.
- ^ "South Central Railway". scr.indianrailways.gov.in. 2022-02-11 रोजी पाहिले.
- ^ Jul 29, TNN /; 2011; Ist, 04:10. "Nizam-era airport lies neglected | Hyderabad News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-02-11 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)