विवाह (चित्रपट)

विवाह
चित्र:Vivah (2006 film) poster.jpg
प्रदर्शित पोस्टर
दिग्दर्शन सूरज आर. बड़जात्या
निर्मिती अजित कुमार बड़जात्या
कमल कुमार बड़जात्या
राजकुमार बड़जात्या
कथा सूरज आर. बड़जात्या
पटकथा सूरज आर. बड़जात्या
आकाश करण अटल
( 'संवाद' '")
प्रमुख कलाकार शाहिद कपूर
अमृता राव
मोहनीश बहल
अनुपम खेर
आलोक नाथ
सीमा बिस्वास
छाया हरीश जोशी
संगीत रवींद्र जैन
देश भारत
भाषा [[हिंदी भाषा|हिंदी]]
प्रदर्शित साचा:Film date
वितरक राजश्री प्रॉडक्शन
अवधी १६० मिनिटे
निर्मिती खर्च ८ करोड[]
एकूण उत्पन्न ५३.९ करोड[]



विवाह हा २००६ मधील भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक चित्रपट होता. सुराज आर. बड़जात्या यांनी हा चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला होता. यातील प्रमुख कलाकार शाहिद कपूर आणि अमृता राव आहेत. याची निर्मिती आणि वितरण राजश्री प्रॉडक्शनने केले होते. विवाहा दोन व्यक्तींची कहाणी आहे. यात लग्न ठरल्यापासून लग्नापर्यंतची, लग्नाची आणि लग्नानंतरची गोष्ट आहे.

विवाह हा शाहिद कपूर आणि अमृता राव या दोघांची भूमिका असणारा चौथा चित्रपट आहे. १० नोव्हेंबर २००६ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा त्या वर्षातील सर्वात मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट बनला. याने जगभरात एकूण ₹५३.९ करोड (यूएस 7.8 दशलक्ष डॉलर्स) पेक्षा जास्त कमाई केली. याचे मिश्र समिक्षण झाले. काही समिक्षकांना हे नाटकीयरित्या उणीव नसलेले आणि न फुललेले वाटले. परंतु काही समिक्षकांना यातील लग्नाचे चित्रण ज्या पद्धतीने केले आहे त्या मार्गाने बदल घडवून आणण्याचे श्रेय देखील दिले गेले आहे. ते एक अनपेक्षित यश होते. शाहिद कपूर आणि अमृता राव यांचे त्या काळचे सर्वात मोठे व्यावसायिक यश ठरले.

शाहिद कपूरच्या अभिनयाने त्यांला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळवून दिले तर अमृता रावला स्क्रीन अ‍ॅवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषीक मिळाले. विवाह हा पहिला भारतीय चित्रपट आहे जो एकाच वेळी सिनेमा थिएटर आणि इंटरनेटवर प्रदर्शित झाला (प्रॉडक्शन कंपनीच्या अधिकृत साइटद्वारे). हा चित्रपट तेलगू भाषेतही डब करण्यात आला होता आणि परिणयम नावाने प्रदर्शित झाला होता.

कथानक

पूनम (अमृता राव) ही मध्यमवर्गीय मुलगी असून ती मधुपूर नावाच्या छोट्या गावात राहते. जेव्हा ती खूप लहान होती तेव्हाच तिच्या आईवडिलांचा मृत्यू होतो. त्यापच्शात तिचे काका कृष्णकांत (आलोक नाथ) यांनीच तिच्या आयुष्यातील वडिलांची पोकळी भरून् काढतात. परंतु तिची काकू (सीमा विश्वास) तिचा हेवा करते आणि पूनमला स्वतःचे मूल म्हणून स्वीकारण्यात नकार देते. तिची स्वतःची मुलगी रजनी (अमृता प्रकाश) ही गहुवर्णी असते आणि पूनमपेक्षा कमी सुंदर असते. हरिश्चंद्र (अनुपम खेर) हे नवी दिल्ली येथील एक प्रख्यात व्यावसायिक असतात. त्याला दोन मुले असतात. सुनील (समीर सोनी) ज्याने भावना (लता सभरवाल) बरोबर लग्न केले आहे आणि प्रेम (शाहिद कपूर), जो अविवाहित, मितभाषी आणि चांगला शिकलेला आहे. पूनमचे साधे आणि प्रेमळ राहणीमान कृष्णाकांत यांना प्रभावित करते. ते भगतजी (मनोज जोशी) यांचे जवळचे मित्र आणि व्यवसायाने ते सोनार असतात. पूनमच्या लग्नाची मागणी प्रेमसाठी घेऊन ते भगतजी कडे जातात. हरिश्चंद्रच्या मते प्रेम लग्नासाठी खूपच लहान आहे आणि प्रथम त्याने आपल्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असे वाटते. तरीही हरीशचंद्र प्रेमला काहीही निर्णय घेण्यापूर्वी एकदा पूनमला भेटण्यास सांगतो. वडिलांच्या इच्छेचा आदर करत प्रेम पूनमला भेटण्यास आणि अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी एकदा भेटण्याचा निर्णय घेतो. ते कृष्णकांतच्या कुटूंबाला भेट देतात आणि प्रेम आणि पूनम यांचा एकमेकांशी परिचिय होतो. त्यांच्या दरम्यानचे पहिले संभाषण थोडेसे त्रासदायक असते. परंतु प्रेम आणि पूनम लगेचच एकमेकांकडे आकर्षित झाल्याने ते लग्न करण्यास तयार होतात. प्रेम आणि पूनमचा साखरपुडा होतो आणि लग्न सहा महिन्यानंतर ठरते. कृष्णकांत प्रेमच्या कुटूंबाला सोम सरोवर येथील त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित करतो कि जेणेकरून प्रेम आणि पूनम यांना एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकतील.अगदी लग्न उद्यावर येऊन ठेपलेले असताना,लग्नस्थळी निघालेले असताना अचानकच पूनमच्या घराला आग लागते. सर्व जण वाचतात..मात्र रजनी आतच अडकल्याने पूनम तिला वाचविण्यासाठी आत जाते.. आणि तिला बाहेर फेकून वाचविताना स्वतः च्याच अंगावर जळका वासा पडल्याने जखमी होऊन बेशुद्ध पडते. तिला दवाखान्यात नेले जाते..येथे प्रेमच्या घरातील पोहोचतात..आता मुलीचे लग्न रद्द होणार, स्थळ नकार देणार..तसेच पूनमची अवस्था या सर्व चिंतांनी निराश झालेल्या पूनमच्या काकांना प्रेमच्या घरातील मंडळी आधार देतात..तसेच प्रेमही पूनमला बरे होण्यास मदत करतो.. यादरम्यान दोघांतील प्रेम वाढत जाते..प्रेमने पूनमला स्वीकारलेले असते..शेवट आनंदी होतो.

कलाकार

  • प्रेम बाजपेयी म्हणून शाहिद कपूर
  • पूनम मिश्रा / पूनम प्रेम बाजपेयी म्हणून अमृता राव
  • अनुपम खेर, प्रेम यांचे वडील हरिश्चंद्र बाजपेयी
  • कृष्णकांत मिश्रा म्हणून आलोक नाथ, पूनम काका
  • पूनमची काकू आणि कृष्णाकांत यांची पत्नी म्हणून राम विश्वास
  • सुनील बाजपेयी, प्रेम यांचा मोठा भाऊ म्हणून समीर सोनी
  • भावना बाजपेयी, प्रेम यांची मेव्हणी आणि सुनील यांची पत्नी म्हणून लता सभरवाल
  • मनोज जोशी भगतजी म्हणून
  • अमृता प्रकाश रजनी मिश्रा (छोटी), पूनमची चुलत भाऊ आणि राम आणि कृष्णकांत यांची मुलगी
  • अमेय पांड्या राहुल म्हणून
  • दिनेश लांबा मुनिमच्या भूमिकेत
  • हरिश्चंद्र, सुनील आणि प्रेम यांच्या कार्यालयात जैन सियाल.
  • मृणाल देशराज हरिश्चंद्र, सुनील आणि प्रेम यांच्या कार्यालयात स्टाफ म्हणून.
  • डॉ. राशिद खान म्हणून मोहनीश बहल

संदर्भ

  1. ^ "Vivah". Box Office India. 24 December 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 August 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Top Lifetime Grossers Worldwide (IND Rs)". Box Office India. 21 October 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 28 September 2014 रोजी पाहिले.

बाह्यदुवे