संकेतन उपकरणे


पॉंइंटिंग, म्हणजे बोट दाखवणे हा खरे तर मनुष्याचा स्वभाव आहे. पॉंइंटिंग उपकरणे ही सिस्टीम युनिटमधल्या हव्या त्या बिंदूवर जाऊन निवडलेल्या मेंन्यूच इनपुटमध्ये रूपांतर करतात. माऊस, जॉयस्टीक, तच स्क्रीन, लाइट पेन आणि स्टायलस असे पॉंइंटिंग उपकरणांचे प्रकार आहेत.

माऊस

मॉनिटरवर दिसणाऱ्या पॉंइंटरवर माऊस नियंत्रण ठेवतो. माऊस पॉंइंटर साधारणपणे बाणाच्या आकाराचा असतो. ज्या प्रकारच्या ॲप्लिकेशन चालू असेल, त्यानुसार माऊसचा आकार बदलतो. माऊसला एक, दोन किंवा त्याहूनही अधिक बटणे असू शकतात. या बटणांचा उपयोग कमांड पर्याय निवडण्यासाठी आणि मॉनिटरवर माऊसचा पॉंइंटर नियंत्रित करण्यासाठी होतो. काही माऊसना व्हील बटण असते. मॉनिटरवर माहिती बघताना, वर-खालच्या पानांवर जाण्यासाठी त्याचा उपयोग होतो. माऊसचे निरनिराळे प्रकार आहेत. तीन मूलभूत प्रकार याप्रमाणे.

ऑप्टिकल माऊस

ऑप्टिकल माऊसमध्ये फिरणारा भाग नसतो. हा सध्या सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे. माऊसबाहेर पडणारा प्रकाश माऊसच्या हालचालींवर नियंत्रण ठेवतो. ऑप्टिकल माऊस कोणत्याही प्रकारच्या पृष्ठभागावर वापरता येतो.

मेकॅनिकल माऊस

या माऊसच्या तळाशी गोलाकार फिरणारा चेंडू असतो. तो वायरने सिस्टीम युनिटला जोडलेला असतो. मऊ, सरळ पृष्ठभाग किंवा माऊस पॅडवरून माऊस फिरवला कि रोलर चेंडू फिरतो आणि मॉनिटरवरचा पॉंइंटर नियंत्रित केला जातो.

कॉर्डलेस किंवा बिनतारी माऊस

या प्रकारचा माऊस बॅटरीवर चालतो. सिस्टीम युनिटशी संपर्क साधण्यासाठी कॉर्डलेस माऊस हा रेडीओ लहरी किंवा इन्फ्रारेड लहरींचा उपयोग करतो. या माऊसला वायरची गरज नसल्यामुळे डेस्कवर मोकळी जागा उरते.

ट्रॅकबॉल्स

टच सरफेस, आणि पॉंइंटिंग स्टिक ही तीन उपकरणहि माऊससारखीच आहेत. ट्रॅकबॉल्सला रोलरबॉल देखील म्हणतात. बोटांनी कीबोर्डच्या लहान चेंडू फिरवून पॉंइंटर नियंत्रित करता येते. टच सरफेस किंवा टचपॅडच्या पृष्ठभागावर बोट फिरवून किंवा दाबून पॉंइंटर नियंत्रित करता येतो. कीबोर्डमध्ये असलेली पॉंइंटिंग स्टिक बोटांनी हलवून पॉंइंटर नियंत्रण करता येते.