सर्जनशील भाषाशास्त्र

सर्जनशील भाषाशास्त्र ही एक विचारधारा आहे. ही विचारधारा व्याकरणातील सर्जनशील व्याकरण हीच संकल्पना वापरते "सर्जनशील व्याकरण" ही व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे वापरली जाते. आणि म्हणून "सर्जनशील भाषाशास्त्र" हे सुद्धा विविध प्रकारे वापरली जाऊ शकणारी संज्ञा आहे. सर्जनशील व्याकरण यात मर्यादित स्वरूपातील नियम आणि रिती आहेत. हे नियम व रिती शुद्ध वाक्य निर्मिती साठी भाषे मध्ये वापरले जातात. सर्जनशील भाषाशास्त्र ही संज्ञा भाषा शास्त्री नॉम चॉम्स्की यांच्या 'बदलते व्याकरण' या शोध निबंधानंतर त्यांच्या विचारांसाठीही वापरली गेली आहे.