सान मिगेल काउंटी, कॉलोराडो
सान मिगेल काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४ काउंटीपैकी एक आहे. 2020च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ८.०७२ होती. [१] या काउंटचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर टेल्युराइड आहे. [२] काउंटीला या प्रदेशातून वाहणाऱ्या सान मिगेल नदीचे नाव दिले गेले आहे.
इतिहास
सान मिगेल काउंटीची रचना २७ फेब्रुवारी, १८८३ रोजी यूरे काउंटीमधून करण्यात आली.
१८७५मध्ये येथील टेल्युराइड शहराजवळ सोने सापडले. या प्रदेशातील स्मगलर-युनियन, टॉमबॉय आणि लिबर्टी बेल या तीन खाणींतून १९२०पर्यंत १०० टन सोने काढण्यात आले आहे.
चतुःसीमा
- उत्तर - माँट्रोझ काउंटी
- पूर्व - यूरे काउंटी
- आग्नेय - सान हुआन काउंटी
- दक्षिण - डोलोरेस काउंटी
- पश्चिम - सान हुआन काउंटी, युटा
प्रमुख मार्ग
शहरे
- माउंटन व्हिलेज
- नॉरवूड
- ओफिर
- सावपिट
- टेल्युराइड
संदर्भ
- ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. September 5, 2021 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.