हिरोशिमा किल्ला
हिरोशिमा किल्ला 広島城 | |
---|---|
हिरोशिमा, जपान | |
Coordinates | 34°24′10″N 132°27′33″E / 34.40278°N 132.45917°E |
प्रकार | अझुची - मोमोयामा किल्ला |
उंची | १२.४ मीटर (४१ फूट) (दगडी पाया), २६.६ मीटर (८७ फूट) (पुनर्बांधित बालेकिल्ला, पाच मजले) |
जागेची माहिती | |
द्वारे नियंत्रित |
मोरी कुळ (१५९२ - १६००, |
परिस्थिती | पुनर्बांधित, इतिहास संग्रहालय म्हणून सध्या उभा आहे |
Site history | |
बांधले |
१५९२ - १५९९ (मुळ बांधणी) १९५८ (पुनर्बांधणी) |
याने बांधले | मेरी टेरुमोटो |
सध्या वापरात | १५९२ - १९४५ |
साहित्य | दगड, लाकूड, प्लास्टर भिंती (मुळ बांधणी); काँक्रीट, स्टील, लाकूड, दगड, प्लास्टर (पुनर्बांधणी) |
उध्वस्त झालेले | ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने केलेल्या अणुबाँबच्या हल्ल्यात बेचिराख झाला. |
लेखन त्रुटी:"infoboxTemplate" ही क्रिया अस्तित्वात नाही. |
हिरोशिमा किल्ला (広 島 城 हिरोशिमा-जा), ज्याला कार्प किल्ला (鯉城 रिजा) या नावानेही ओळखले जातो. हा किल्ला हिरोशिमा, जपान येथे स्थित आहे. येथे हिरोशिमा हान (फिफ)च्या डेम्यो (सामंत) यांचे घर होते. किल्ल्याचे बांधकाम १५९० च्या दशकात केले गेले होते, आणि ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने केलेल्या अणुबाँब हल्ल्यामध्ये तो उध्वस्त झाला. इ.स. १९५८ मध्ये हा किल्ला परत मुळ प्रतिकृतीनुसार बांधला. सध्या तिथे इतिहासाचे संग्रहालय बांधले आहे जे हिरोशिमाचा इतिहास दर्शवतो.
इतिहास
मेरी टेरुमोटो हे टोयोटोमी हिडिओशीच्या पाच सदस्यिय मंडळातील एक होते. त्यांनी १५८९ ते १५९९ दरम्यान हिरोशिमा किल्ला बांधला. [१] हा किल्ला ओटागावा नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशात स्थित होता. त्यावेळी हिरोशिमा शहर किंवा गाव नव्हते आणि त्या भागास गोकामुरा असे म्हणतात, म्हणजे "पाच गावे". इ.स. १५९१ च्या सुरुवातीस मोरी टेरुमोटो हे योशिदा-क्रिमामा किल्ल्याहून येथे आले आणि या किल्ल्यावरून त्यांनी नऊ प्रांत चालविले, ज्यात सध्याची शिमने, यामागुची, तोतोरी, ओकायमा आणि हिरोशिमा प्रांते आहेत. जेव्हा किल्ल्याचे बांधकाम सुरू झाले तेव्हा गोकामुराचे नाव बदलून हिरोशिमा असे ठेवले गेले. याचे मागचे कारण लोकांनी अधिक प्रभावी नावाची मागणी केली होती. "हिरो" हे नाव मुरी घराण्याचे पूर्वज ओनो हिरोमोटोकडून घेतले होते, आणि "शिमा" फुकुशिमा मोटोनागाकडून घेतले गेले होते, ज्याने मेरी टेरुमोटोला किल्ल्याची जागा निवडण्यास मदत केली. "हिरोशीमा" हे नाव मोठे बेट म्हणजे किल्ल्याच्या जागेजवळील ओटागावा नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेशातील अनेक मोठ्या बेटांच्या अस्तित्वातून आलेले आहे, अशी काहीजण ख्याती सांगतात.
इ.स. १६०० मध्ये सेकीगहाराच्या लढाईनंतर मोरीला या किल्ल्यातून बाहेर काढले गेले. त्यांनी आजच्या यामागुची प्रांतात हगी येथे आसरा घेतला. त्यानंतर फुकुशिमा मसानोरी अकी आणि बिंगो प्रांत (आजचा हिरोशिमा प्रांत) आणि हिरोशिमा किल्ल्याचा स्वामी बनला. तथापि, नवीन टोकुगावा शोगुनेटने इडोच्या परवानगीशिवाय कोणत्याही किल्ल्याचे बांधकाम करण्यास मनाई केली. हा शोगुनेटचा एक आराखडा होता ज्यामुळे तेथील सामंतांना (डेम्यो) मोठ्या प्रमाणात शक्ती मिळवता येणार नाही आणि शोगुनेटला त्यांच्यापासून धोका निर्माण होणार नाही. इडोच्या परवानगीशिवाय इ.स.१६१९ मध्ये आलेल्या पूरानंतर फुकुशिमाने किल्ल्याची दुरुस्ती केली तेव्हा त्याला शिक्षा म्हणून आजच्या नागानो प्रांतात कवनकाजीमा येथे पाठवण्यात आले. त्यानंतर असानो नागाकिरा किल्ल्याचा स्वामी बनला.
संदर्भ
जपानचे सामुराई किल्ले. https://www.samuraicastles.com Archived 2021-03-02 at the Wayback Machine.
- ^ Hinago, Motoo (1986). Japanese Castles. Kodansha International Ltd. and Shibundo. p. 46. ISBN 0870117661.
बाह्य दुवे
विकिमिडिया कॉमन्सवर Hiroshima Castle शी संबंधित संचिका आहेत.
- अधिकृत संकेतस्थळ
- Junji Akechi, "New theory offered for collapse of Hiroshima Castle tower in the bombing" Chugoku Shimbun Website Archived 2018-06-12 at the Wayback Machine.
- 1423635794 OpenStreetMap वर हिरोशिमा किल्ला