हॅरोल्ड गॉडविन्सन

हॅरोल्ड गॉडविन्सन तथा हॅरोल्ड दुसरा (इ.स. १०२२ - १४ ऑक्टोबर, इ.स. १०६६:हेस्टिंग्ज, इंग्लंड) हा इंग्लंडचा शेवटचा सॅक्सन राजा होता. हा ६ जानेवारी, इ.स. १०६६ ते हेस्टिंग्जच्या लढाईत त्याच्या मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

हॅरोल्ड वेसेक्सचा अर्ल गॉडविन आणि गिथा थोर्केस्डॉटिरचा मुलगा होता. गिथा राजा क्नुटची भावजय होती. या नात्याने हॅरोल्ड क्नुटचा नातेवाईक होता. इंग्लंडची राजसत्ता हस्तगत करताना त्याने या नात्याचा उपयोग करून घेतला.