इ.स. १८६५
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे - १८८० चे |
वर्षे: | १८६२ - १८६३ - १८६४ - १८६५ - १८६६ - १८६७ - १८६८ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- फेब्रुवारी १७ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
- फेब्रुवारी २२ - टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.
- एप्रिल १२ - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.
- एप्रिल १४ - जॉन विल्कस बूथने अब्राहम लिंकनवर गोळी झाडली. लिंकन दुसऱ्या दिवशी मृत्यू पावला.
- एप्रिल २६ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
- एप्रिल २६ - अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
- एप्रिल २७ - अमेरिकन गृहयुद्धातील उत्तरेचे सुटलेले युद्धबंदी घेउन जाणारे जहाज सुलतानावर मिसिसीपी नदीत स्फोट. १,७०० ठार.
- मे ५ - ओहायोच्या सिनसिनाटी शहराजवळ अमेरिकेतील पहिल्यांदा रेल्वे लुटण्यात आली.
- मे १० - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेच्या सैन्याने दक्षिणेच्या राष्ट्राध्यक्ष जेफरसन डेव्हिसला पकडले.
- मे १७ - आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची (ITU) स्थापना.
- मे २५ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामात मोबिल शहराजवळ शस्त्रसाठ्यात स्फोट. ३०० ठार.
- जून १९ - अमेरिकेतील गॅल्व्हेस्टन येथील गुलामांना मुक्ती. हा दिवस येथपासून जून्टीन्थ या नावाने साजरा केला जातो.
- जुलै ५ - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा ईंग्लंडमध्ये लागू.
- ऑगस्ट १६ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
जन्म
मृत्यू
- एप्रिल १५ - अब्राहम लिंकन, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा राष्ट्राध्यक्ष.
- सप्टेंबर २ - विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.