इ.स. १९६४
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे - १९८० चे |
वर्षे: | १९६१ - १९६२ - १९६३ - १९६४ - १९६५ - १९६६ - १९६७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी ९ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.
- फेब्रुवारी १७ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉॅंग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
- मार्च ६ - कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.
- मार्च ६ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी.
- एप्रिल २६ - टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
- मे २ - व्हियेतनाम युद्ध - साइगॉनच्या बंदरात अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. कार्ड बुडाली.
- जून २१ - अमेरिकेत मिसिसिपी राज्यात समान हक्कांसाठी आंदोलन करणाऱ्या ३ व्यक्तींना कु क्लुक्स क्लॅन ठार मारले.
- जुलै ३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने १९६४चा नागरी हक्क कायद्यावर सही केली.
- जुलै ६ - मलावीला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- जुलै २० - व्हियेतनाम युद्ध - व्हियेतकॉॅंगने दक्षिण व्हियेतनामवर हल्ला केला. ११ सैनिक व ४० नागरिक ठार.
- ऑगस्ट ७ - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन काँग्रेसने टोंकिनच्या अखातातील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनला सर्वाधिकार दिले.
- ऑगस्ट १६ - व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑॅंग व्हान मिन्हला पदच्युत केले.
जन्म
- जानेवारी २ - रुमेश रत्नायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- मार्च ११ - रायमो हेलमिनेन, फिनलंडचा आघाडीचा हॉकीपटू.
- एप्रिल ६ - डेव्हिड वुडर्ड, अमेरिकन लेखक आणि संगीत कंडक्टर.
- जून ७ - ग्रेम लॅबरूय, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- जुलै १३ - उत्पल चटर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २४ - बॅरी बॉन्ड्स, अमेरिकन बेसबॉल अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- ऑगस्ट ८ - पॉल टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ७ - नुरुल आबेदिन, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - इरफान भट्टी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ४ - डेव्हिड ब्रेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - सरदिंदू मुखर्जी, भारतीय क्रिकेट खेळाडू.