कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर

जर्मनीतील संग्रहालयात ठेवलेले कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर.

कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे विमानात संवादाच्या नोंदी ठेवणारे उपकरण आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरमध्ये वैमानिक, सहवैमानिक व मुख्य अभियंता, हवाई सुंदरींचे संवाद नोंदवले जातात. पूर्वी त्यासाठी मॅग्नेटिक टेपचा वापर केला जात असे. आता मेमरी चिप वापरली जाते. वैमानिक व इतर कर्मचाऱ्यांतील संभाषण, वैमानिक कक्षातील आवाज, यंत्रांनी सावधगिरीचे इशारे होणारे आवाज यामध्ये ध्वनीमुद्रित होतात. याशिवाय विमानातळाच्या नियंत्रण कक्षाशी केलेले संभाषणही यात ध्वनीमुद्रित होत असते. विमानाला दिली गेलेली हवामानविषयक माहिती व इशारे इत्यादी सर्व गोष्टींचे ध्वनिमुद्रण यात होते. हे सुमारे दोन तासांसाठी होत असे व चुंबकीय फित पुसली जाऊन त्यावर नवीन ध्वनीमुद्रण घडत असे. यात काही काळाने फित खराब होऊन ती बदलावी लागत असे. आता नवीन डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे करावे लागत नाही. तसेच ध्वनीमुद्रित करण्याला काल मर्यादाही मोठी झाली आहे. याचा अभ्यासाला उपयोग होतो.

हे एक असे यंत्र आहे ज्यात विमानाच्या चालनकक्षातील सर्व आवाज नोंदविण्याची क्षमता असते.याचा उपयोग विमानापघातानंतर किंवा एखाद्या घटनेनंतर,त्याचे अन्वेषण करणे यासाठी करण्यात येतो.पायलटच्या मायक्रोफोन व इयरफोनशी तसेच कॉकपिटच्या छतावर लावण्यात आलेल्या क्षेत्रिय मायक्रोफोनशी हे संलग्न असते व ते तेथील सर्व आवाज नोंदविते.

याची क्षमता,चार चॅनेलद्वारे सुमारे दोन तास संभाषण नोंदविण्याची असते.सध्या यात सुधारणा करण्यात येउन फ्लाइट डेटा रेकॉर्डर हे एकत्रित उपकरण करण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा

हे सुद्धा पहा