क्रिकेट विश्वचषक, २००३

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २००३
अधिकृत चिन्ह
दिनांक ९ फेब्रुवारी – २३ मार्च
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
झिम्बाब्वे झिम्बाब्वे
केन्या केन्या
विजेते ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया (३ वेळा)
सहभाग १४
सामने ५४
प्रेक्षक संख्या ६,२६,८४५ (११,६०८ प्रति सामना)
मालिकावीर भारत सचिन तेंडुलकर
सर्वात जास्त धावा भारत सचिन तेंडुलकर (६७३)
सर्वात जास्त बळी श्रीलंका चमिंडा वास (२३)
१९९९ (आधी) (नंतर) २००७

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आयोजित केलेली आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २००३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ९ फेब्रुवारी ते २३ मार्च २००३ दरम्यान पार पडलेल्या सदर स्पर्धेचे यजमान पद दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केन्या ह्या देशांकडे संयुक्तरित्या सोपवण्यात आले होते. आफ्रिकेमध्ये खेळविण्यात आलेला ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा होती.

सदर स्पर्धेत १४ संघांचा सहभाग होता, विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील ही आजवरची सर्वात मोठी संख्या होती, ज्यामध्ये एकूण ५४ सामने खेळविले गेले. ह्या स्पर्धेचे स्वरूप क्रिकेट विश्वचषक, १९९९ प्रमाणेच होते, ज्यामध्ये संघांची दोन समान गटांमध्ये विभागणी केली गेली होती आणि प्रत्येक गटातील तीन अव्वल संघ सुपर सिक्स फेरी साठी पात्र ठरले.

स्पर्धेमध्ये अनेक धक्कादायक निकाल पहायला मिळाले, ज्यात दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड ह्या संघांवर गट फेरीतच बाद होण्याची नामुष्की ओढवली (दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ-लुईस नियमाचा फटका बसला आणि त्यांची सुपर सिक्स फेरी अवघ्या १ धावेने हुकली).[] देशातील राजकिय अशांततेमुळे इंग्लंडने त्यांचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना सोडून दिला, ज्यामुळे झिम्बाब्वेचा सुपर सिक्स फेरीमध्ये समावेश होऊ शकला. त्याचप्रमाणे, सुरक्षिततेच्या कारणांमुळे न्यू झीलंडने त्यांचा केन्याविरुद्धचा सामना सोडून दिला, ज्यामुळे केन्याचा संघ कसोटी दर्जा नसताना उपांत्य सामन्यात पोहोचणारा पहिला संघ ठरला. त्याशिवाय आणखीएक धक्का देणारी बातमी स्पर्धा सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आली, ती म्हणजे ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला, प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनामुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले.[]

आपले सर्व ११ सामने जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने जोहान्सबर्ग येथील वॉन्डरर्स स्टेडियम झालेल्या अंतिम सामन्यात भारताला पराभूत करून स्पर्धेचे विजेतेपद मिळविले.[] विश्वचषक स्पर्धा तीन वेळा जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ ठरला.

संघ

क्रिकेट विश्वचषक, २००३ स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक १४ संघांचा समावेश होता. कसोटी क्रिकेट खेळणारे १० संघ स्पर्धेसाठी आपोआप प्राप्त ठरले, ज्यामध्ये नुकतेच सभासदत्व मिळवलेला बांगलादेश आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय संघाचा पूर्ण दर्जा मिळवलेल्या केन्याचा समावेश होता. इतर तीन स्थानांवर कॅनडा येथे झालेल्या २००१ आय.सी.सी. चषक स्पर्धेतील अव्वल तीन संघांचा समावेश करण्यात आला, ज्यामध्ये अनुक्रमे विजेते नेदरलँड्स आणि कॅनडा तसेच नामिबिया हे संघ होते. नामिबियाची ही पहिलीच विश्वचषक स्पर्धा, तर दुसऱ्यांदा सहभागी होणारे नेदरलँड्स आणि कॅनडा ह्यापुर्वी अनुक्रमे १९९६ आणि १९७९ मध्ये सहभागी झाले होते.

विश्वचषक १९९९ मधील स्पर्धेचे स्वरूप ह्यावेळी सुद्धा तसेच ठेवण्यात आले, ज्यामध्ये १४ संघांची दोन समान गटांमध्ये विभागणी करण्यात आली. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीसाठी पात्र ठरले, ज्यामध्ये एकमेकांविरुद्ध मिळवलेले गुण विचारात घेतले गेले. सुपर सिक्स फेरीतील अव्वल चार संघांनी उपांत्य फेरीमध्ये लढत दिली आणि उपांत्य फेरीतील दोन विजेत्या संघांमध्ये अंतिम सामना खेळवला गेला.

पूर्ण सभासद
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड भारतचा ध्वज भारत
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
संलग्न सभासद
केन्याचा ध्वज केन्या कॅनडाचा ध्वज कॅनडा
नामिबियाचा ध्वज नामिबिया Flag of the Netherlands नेदरलँड्स

यजमान शहरे आणि मैदाने

शहरे मैदाने क्षमता सामने
दक्षिण आफ्रिका जोहान्सबर्ग वॉन्डरर्स स्टेडियम ३४,०००
दक्षिण आफ्रिका दरबान सहारा स्टेडियम किंग्जमेड २५,०००
दक्षिण आफ्रिका केप टाऊन न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान २५,०००
दक्षिण आफ्रिका सेंच्युरियन सेंच्युरियन पार्क २३,०००
दक्षिण आफ्रिका ब्लूमफॉंटेन गुडइयर पार्क २०,०००
दक्षिण आफ्रिका पोर्ट एलिझाबेथ सेंट जॉर्जेस ओव्हल १९,०००
दक्षिण आफ्रिका पॉचेफस्ट्रूम नॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान १८,०००
दक्षिण आफ्रिका ईस्ट लंडन बफेलो पार्क १६,०००
दक्षिण आफ्रिका किंबर्ले डि बीयर्स डायमंड ओव्हल ११,०००
दक्षिण आफ्रिका पार्ल बोलंड पार्क १०,०००
दक्षिण आफ्रिका बेनोनी विलोमूर पार्क २०,०००
दक्षिण आफ्रिका पीटरमारित्झबर्ग पीटरमारित्झबर्ग ओव्हल १२,०००
झिम्बाब्वे हरारे हरारे स्पोर्ट्स क्लब १०,०००
झिम्बाब्वे बुलावायो क्वीन्स स्पोर्ट्‌स क्लब ९,०००
केन्या नैरोबी नैरोबी जिमखाना क्लब ८,०००
झिम्बाब्वे मधील स्थळे
केन्या मधील स्थळे

गट फेरी

प्रत्येक गटातील तीन अव्वल संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले. त्यांनी एकमेकांविरुद्ध गट फेरी मध्ये मिळवलेले गुण पुढील फेरीसाठी मोजले गेले, तसेच जे संघ पुढील फेरीमध्ये जाण्यास अपयशी ठरले त्यांच्या विरुद्ध मिळविलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश गुण मोजले गेले.[]

अ गट

संघ सा वि नि.धा. गुण अ. गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २.०५ २४ १२
भारतचा ध्वज भारत १.११ २०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ०.५० १४ ३.५
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०.८२ १२
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.२३ १०
Flag of the Netherlands नेदरलँड्स −१.४५
नामिबियाचा ध्वज नामिबिया −२.९६
१० फेब्रुवारी २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३४०/२ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
१०४/५ (२५.१ षटके)
झिम्बाब्वे ८६ धावांनी विजयी (ड/लु)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे



११ फेब्रुवारी २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१०/८ (५० षटके)
वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२८ (४४.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८२ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका



१२ फेब्रुवारी २००३
धावफलक
भारत Flag of भारत
२०४ (४८.५ षटके)
वि Flag of the Netherlands नेदरलँड्स
१३६ (४८.१ षटके)
भारत ६८ धावांनी विजयी
बोलंड पार्क, पार्ल, दक्षिण आफ्रिका



१३ फेब्रुवारी २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
झिम्बाब्वे विजयी (वॉकओव्हर)
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे



१५ फेब्रुवारी २००३
धावफलक
भारत Flag of भारत
१२५ (४१.४ षटके)
वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१२८/१ (२२.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी राखून विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



१६ फेब्रुवारी २००३
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
१४२/९ (५० षटके)
वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१४४/४ (२३.२ षटके)
इंग्लंड ६ गडी राझखून विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका



१६ फेब्रुवारी २००३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५५/९ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
८४ (१७.४ षटके)
पाकिस्तान १७१ धावांनी विजयी
डि बीयर्स डायमंड ओव्हल , किंबर्ले, दक्षिण आफ्रिका



१९ फेब्रुवारी २००३
धावफलक
भारत Flag of भारत
२५५/७ (५० षटके)
वि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१७२ (४४.४ षटके)
भारत ८३ धावांनी विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे, झिम्बाब्वे



१९ फेब्रुवारी २००३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७२ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
२१७/९ (५० षटके)
इंग्लंड ५५ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका



२० फेब्रुवारी २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१७०/२ (३६ षटके)
वि Flag of the Netherlands नेदरलँड्स
१२२ (३०.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ७५ धावांनी विजयी (ड/लु)
नॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान, पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका



२२ फेब्रुवारी २००३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२४८/८ (५० षटके)
वि पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३४ (३१ षटके)
इंग्लंड ११२ धावांनी विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका



२३ फेब्रुवारी २००३
धावफलक
भारत Flag of भारत
३११/२ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
१३० (४२.३ षटके)
भारत १८१ धावांनी विजयी
सिटी ओव्हल, पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका



२४ फेब्रुवारी २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२४६/९ (५० षटके)
वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२४८/३ (४७.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो, झिम्बाब्वे



२५ फेब्रुवारी २००३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५३/९ (५० षटके)
वि Flag of the Netherlands नेदरलँड्स
१५६ (३९.३ षटके)
पाकिस्तान ९७ धावांनी विजयी
बोलंड पार्क, पार्ल, दक्षिण आफ्रिका



२६ फेब्रुवारी २००३
धावफलक
भारत Flag of भारत
२५०/९ (५० षटके)
वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१६८ (४५.३ षटके)
भारत ८२ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान, दक्षिण आफ्रिका



२७ फेब्रुवारी २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३०१/६ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
४५ (१४ षटके)
ऑस्ट्रेलिया २५६ धावांनी विजयी
नॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान, पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका



२८ फेब्रुवारी २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
३०१/८ (५० षटके)
वि Flag of the Netherlands नेदरलँड्स
२०२/९ (५० षटके)
झिम्बाब्वे ९९ धावांनी विजयी
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो, झिम्बाब्वे



१ मार्च २००३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२७३/७ (५० षटके)
वि भारतचा ध्वज भारत
२७६/४ (४५.४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



२ मार्च २००३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२०४/८ (५० षटके)
वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२०८/८ (४९.४ षटके)
ऑस्ट्रेलिया २ गडी राखून विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका



३ मार्च २००३
धावफलक
नेदरलँड्स Flag of the Netherlands
३१४/४ (५० षटके)
वि नामिबियाचा ध्वज नामिबिया
२५० (४६.५ षटके)
नेदरलँड्स ६४ धावांनी विजयी
गुडइयर पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका



४ मार्च २००३
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
७३/३ (१४ षटके)
वि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
अनिर्णित
क्विन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो, झिम्बाब्वे


गट ब

संघ सा वि नि.धा. गुण अ. गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका १.२० १८ ७.५
केन्याचा ध्वज केन्या −०.६९ १६ १०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.९९ १६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १.७३ १४
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज १.१० १४
कॅनडाचा ध्वज कॅनडा −१.९९
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश −२.०५
९ फेब्रुवारी २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२७८/५ (५० षटके)
वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२७५/९ (४९ षटके)
वेस्ट इंडीज ३ धावांनी विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका



१० फेब्रुवारी २००३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२७२/७ (५० षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२५ (४५.३ षटके)
श्रीलंका ४७ धावांनी विजयी
गुडइयर पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका



११ फेब्रुवारी २००३
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१८० (४९.१ षटके)
वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१२० (२८ षटके)
कॅनडा ६० धावांनी विजयी
सहारा मैदान किंग्समेड, दरबान, दक्षिण आफ्रिका



१२ फेब्रुवारी २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
१४० (३८ षटके)
वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१४२/० (२१.२ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
नॉर्थ वेस्ट क्रिकेट मैदान, पॉचेफस्ट्रूम, दक्षिण आफ्रिका



१३ फेब्रुवारी २००३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२४१/७ (५० षटके)
वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२१ (४९.४ षटके)
न्यू झीलंड २० धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका



१४ फेब्रुवारी २००३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१२४ (३१.१ षटके)
वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२६/० (२१.१ षटके)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
सिटी ओव्हल, पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका



१५ फेब्रुवारी २००३
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१९७ (४९ षटके)
वि केन्याचा ध्वज केन्या
१९८/६ (४८.३ षटके)
केन्या ४ गडी राखून विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका



१६ फेब्रुवारी २००३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
३०६ (५० षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२२९/१ (३६.५ षटके)
न्यू झीलंड ९ गडी राखून विजयी (ड/लु)
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका



१८ फेब्रुवारी २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४४/९ (५० षटके)
वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
३२/२ (८.१ षटके)
अनिर्णित
विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका



१९ फेब्रुवारी २००३
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
३६ (१८.४ षटके)
वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३७/१ (४.४ षटके)
श्रीलंका ९ गडी राखून विजयी
बोलंड पार्क, पार्ल, दक्षिण आफ्रिका



२१ फेब्रुवारी २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
केन्या विजयी (वॉकओव्हर)
नैरोबी जिमखाना क्लब, नैरोबी, केन्या



२२ फेब्रुवारी २००३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१०८ (३५.१ षटके)
वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
१०९/० (१२ षटके)
दक्षिण आफ्रिका १० गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका



२३ फेब्रुवारी २००३
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
२०२ (४२.५ षटके)
वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२०६/३ (२०.३ षटके)
वेस्ट इंडीज ७ गडी राखून विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



२४ फेब्रुवारी २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
२१०/९ (५० षटके)
वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१५७ (४५ षटके)
केन्या ५३ धावांनी विजयी
नैरोबी जिमखाना क्लब, नैरोबी, केन्या



२६ फेब्रुवारी २००३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१९८/७ (५० षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९९/३ (३३.३ षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
डि बीयर्स डायमंड ओव्हल , किंबर्ले, दक्षिण आफ्रिका



२७ फेब्रुवारी २००३
धावफलक
दक्षिण आफ्रिका Flag of दक्षिण आफ्रिका
२५४/८ (५० षटके)
वि कॅनडाचा ध्वज कॅनडा
१३६/५ (५० षटके)
दक्षिण आफ्रिका ११८ धावांनी विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका



२८ फेब्रुवारी २००३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२८/६ (५० षटके)
वि वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२२२/९ (५० षटके)
श्रीलंका ६ धावांनी विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका



१ मार्च २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
२१७/७ (५० षटके)
वि बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८५ (४७.२ षटके)
केन्या ३२ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका



३ मार्च २००३
धावफलक
कॅनडा Flag of कॅनडा
१९६ (४७ षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१९७/५ (२३ षटके)
न्यू झीलंड ५ गडी राखून विजयी
विलोमूर पार्क, बेनोनी, दक्षिण आफ्रिका



३ मार्च २००३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२६८/९ (५० षटके)
वि दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका
२२९/६ (४५ षटके)
सामना बरोबरीत (ड/लु)
सहारा मैदान किंग्समेड, दरबान, दक्षिण आफ्रिका



४ मार्च २००३
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
२४६/७ (५० षटके)
वि केन्याचा ध्वज केन्या
१०४ (३५.५ षटके)
वेस्ट इंडीज १४२ धावांनी विजयी
डि बीयर्स डायमंड ओव्हल , किंबर्ले, दक्षिण आफ्रिका


सुपर ६ प्रदर्शन

अग्रेषित केले गेलेले गुण खालीलप्रमाणे मोजले गेले:

इतर पात्र संघाविरुद्ध विजयः ४ गुण
अपात्र संघाविरुद्ध विजयः १ गुण
पात्र संघाविरुद्ध बरोबरी किंवा अनिर्णित सामना: २ गुण
अपात्र संघाविरुद्ध बरोबरी किंवा अनिर्णित सामना: ०.५ गुण

उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेले संघ निळ्या रंगात दाखवले आहेत.

संघ सा वि नि. धा. गुण अ. गुण
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १.८५ २४ १२
भारतचा ध्वज भारत ०.८९ २०
केन्याचा ध्वज केन्या ०.३५ १४ १०
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.८४ ११.५ ७.५
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड −०.९०
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे −१.२५ ३.५ ३.५
७ मार्च २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३१९/५ (५० षटके)
वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२३ (४७.४ षटके)
ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



७ मार्च २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
२२५/६ (५० षटके)
वि भारतचा ध्वज भारत
२२६/४ (४७.५ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
न्यूलॅंड्स क्रिकेट मैदान, केप टाऊन, दक्षिण आफ्रिका



८ मार्च २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५२/७ (५० षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५३/४ (४७.२ षटके)
न्यू झीलंड ६ गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका



१० मार्च २००३
धावफलक
भारत Flag of भारत
२९२/६ (५० षटके)
वि श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०९ (२३ षटके)
भारत १८३ धावांनी विजयीIndia won by 183 runs
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका



११ मार्च २००३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२०८/९ (५० षटके)
वि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११२ (३०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ९६ धावांनी विजयी
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका



१२ मार्च २००३
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३३ (४४.१ षटके)
वि केन्याचा ध्वज केन्या
१३५/३ (२६ षटके)
केन्या ७ गडी राखून विजयी
गुडइयर पार्क, ब्लूमफॉंटेन, दक्षिण आफ्रिका



१४ मार्च २००३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१४६ (४५.१ षटके)
वि भारतचा ध्वज भारत
१५०/३ (४०.४ षटके)
भारत ७ गडी राखून विजयी
सेंच्युरियन पार्क, सेंच्युरियन, दक्षिण आफ्रिका



१५ मार्च २००३
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२५६/५ (५० षटके)
वि झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१८२ (४१.५ षटके)
श्रीलंका ७४ धावांनी विजयी
बफेलो पार्क, ईस्ट लंडन, दक्षिण आफ्रिका



१५ मार्च २००३
धावफलक
केन्या Flag of केन्या
१७४/८ (५० षटके)
वि ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१७८/५ (३१.२ षटके)
ऑस्ट्रेलिया ५ गडी राखून विजयी
सहारा मैदान किंग्समेड, दरबान, दक्षिण आफ्रिका


उपांत्य फेरी

१८ मार्च २००३
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
२१२/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२३/७ (३८.१ षटके)
ॲंड्रू सायमंड्स ९१ (११८)
चमिंडा वास ३/३४ (१० षटके)
कुमार संघकारा ३९ (७०)
ब्रेट ली ३/३५ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया ४८ धावांनी विजयी (ड/लु)
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, दक्षिण आफ्रिका
पंच: रुडी कोर्टत्झन (द.आ.) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)

पोर्ट एलिझाबेथच्या अवघड, मंद खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेच्या अचूक माऱ्याला लढा देत २१२ धावा (७ गडी, ५० षटके) उभारल्या. त्यात कर्णधार रिकी पॉंटिंगचा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवत, अँड्रू सायमंड्सच्या ११८ चेंडूंतील नाबाद ९१ धावांचा महत्त्वाचा वाटा होता. चमिंडा वासने त्याचे स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शन कायम ठेवत ३ गडी बाद केले. ह्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तेजगती गोलंदाजांनी श्रीलंकेच्या वरच्या फळीची दाणादाण उडवली. ब्रेट लीने (८ षटकांमध्ये ३/३५) सुरुवातीलाच ३ गडी बाद केले आणि ग्लेन मॅकग्राने (७ षटकांमध्ये १/२०) एक. ३९व्या षटकामध्ये पावसाला सुरुवात होण्याआधी अचूक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संघ १२३ धावांपर्यंतच (७ गडी, ३८.१ षटके) मजल मारु शकला, ज्या डकवर्थ-लुईस नियमानुसार फारच कमी होत्या. ह्या सामन्यामध्ये पंचांनी नाबाद दिल्यानंतरही अॅडम गिलख्रिस्टने खिलाडूपणे मैदान सोडले.[]


२० मार्च २००३
१४:३०
धावफलक
भारत Flag of भारत
२७०/४ (५० षटके)
वि
केन्याचा ध्वज केन्या
१७९ (४६.२ षटके)
सौरव गांगुली १११ (११४)
पीटर ओंगोन्डो १/३८ (१० षटके)
स्टीव्ह टिकोलो ५६ (८३)
झहीर खान ३/१४ (९.२ षटके)
भारत ९१ धावांनी विजयी
सहारा स्टेडियम किंग्जमेड, दरबान, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेरिल हार्पर (ऑ)
सामनावीर: सौरव गांगुली (भारत)


कसोटी दर्जा प्राप्त नसलेल्या आणि विश्वचषक उपांत्य सामन्यात पोहोचणारा पहिलाच संघ असलेल्या केन्याची घोडदौड थांबली. सचिन तेंडुलकर (१०१ चेंडूंत ८३ धावा, ५ चौकार, १ षट्कार) आणि सौरव गांगुली (११४ चेंडूंत १११ धावा, ५ चौकार, ५ षट्कार), यांच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारतीय संघाने केन्यासमोर २७० धावांचे अवघड आव्हान ठेवले. दरबानमध्ये प्रकाशझोतात भारताच्या झहीर खान (९.३ षटकांमध्ये ३/१२), अनुभवी जवागल श्रीनाथ (७ षटकांमध्ये १/११) आणि आशिष नेहरा (५ षटकांमध्ये २/११) ह्या जलदगती त्रिकूटापुढे केन्याच्या फलंदाजांचा निभाव लागु शकला नाही. केन्याचा संघ ४६.२ षटकांमध्ये १७९ धावांपर्यंतच मजल मारू शकला, ज्यामध्ये स्टीव्ह टिकोलो (८३ चेंडूंत ५६ धावा) हा एकमेव फलंदाज थोडाफार प्रतिकार करू शकला.

अंतिम सामना

२३ मार्च २००३
१०:००
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
३५९/२ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३४ (३९.१ षटके)
रिकी पॉंटिंग १४०* (१२१)
हरभजन सिंग २/४९ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया १२५ धावांनी विजयी
वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका
पंच: स्टीव्ह बकनर (वे) आणि डेव्हिड शेफर्ड (इं)
सामनावीर: रिकी पॉंटिंग (ऑ)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.


आकडेवारी

फलंदाजी

सर्वात जास्त धावा

  1. सचिन तेंडुलकर (भारत) - ६७३
  2. सौरभ गांगुली (भारत) - ४६५
  3. रिकी पॉन्टींग (ऑस्ट्रेलिया) - ४१५

गोलंदाजी

सर्वात जास्त बळी

  1. चामिंडा वास (श्रीलंका) - २३
  2. ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) - २२
  3. ग्लेन मॅक्ग्राथ (ऑस्ट्रेलिया)- २१

अधिक माहिती .. Archived 2006-09-24 at the Wayback Machine.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे