बोरिस बेकर
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/79/Boris_Becker_2007_amk.jpg/250px-Boris_Becker_2007_amk.jpg)
बोरिस फ्रान्झ बेकर (जर्मन: Boris Becker; जन्मः २२ नोव्हेंबर १९६७) हा जर्मनीचा लोकप्रिय माजी टेनिसपटू आहे. बोरिस बेकरने आपल्या टेनिस कारकिर्दीत ६ ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत, तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जर्मनीसाठी सुवर्णपदक पटकावले आहे. विंबल्डन टेनिस स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू (वय वर्षे १७) हा मानही बोरिस बेकरकडे जातो. आपल्या धुवांधार सर्व्हिसमुळे तो चाहत्यांमध्ये बोरिस "बूमबूम" बेकर ह्या टोपणनावाने ओळखला जायचा.