युरोपियन सांस्कृतिक राजधानी

फिनलंडमधील तुर्कू ही २०११ सालामधील युरोपियन सांस्कृतिक राजधानी आहे.
तालिन ही एस्टोनियाची राजधानी देखील २०११ सालामधील युरोपियन सांस्कृतिक राजधानी आहे.

युरोपियन सांस्कृतिक राजधानी हे युरोपियन संघाने दरवर्षी नियुक्त केलेले युरोपामधील एक शहर आहे. एका वर्षासाठी नियुक्त झालेल्या ह्या शहरामध्ये त्या वर्षी युरोपियन संस्कृतीचे प्रदर्शन करणारे सोहळे व समारंभांचे आयोजन केले जाते.

युरोपियन सांस्कृतिक राजधानी नियुक्त करण्याचा प्रस्ताव १९८५ साली मांडण्यात आला व तेव्हापासून दरवर्षी युरोपामधील एक वा अनेक शहरांना सांस्कृतिक राजधानीचा खिताब दिला जातो.

सांस्कृतिक राजधान्यांची यादी

ग्रीसAthens (1985)
इटलीFlorence (1986)
जर्मनीBerlin (1988)
युनायटेड किंग्डमGlasgow (1990)
स्पेनMadrid (1992)
ग्रीसThesaloniki (1997)
इटलीGenoa (2004)
रोमेनियाSibiu (2007)
युनायटेड किंग्डमLiverpool (2008)

बाह्य दुवे

सध्याच्या राजधान्या
मागील राजधान्या
भावी राजधान्या