विकिपीडिया:प्रशासक
विकिपीडियावरील प्रशासक (इंग्लिश विकिसंज्ञा: Bureaucrats, ब्यूरोक्रॅट्स ;) म्हणजे खालील तांत्रिक अधिकार दिलेले सदस्य असतात :
- अन्य सदस्यांना प्रचालक किंवा प्रशासक पदांवर बढती देणे;
- एखाद्या सदस्यखात्यास सांगकाम्या म्हणून मंजुरी देणे किंवा रद्द करणे;
विद्यमान प्रशासक
ही आपोआप तयार झालेली यादी नाही. यामध्ये कदाचित बदल झालेले असू शकतात. सध्याची यादी पहाण्यासाठी कृपया इथे टिचकी द्या.
प्रचालकपद रद्द करणे
जर प्रचालक अधिकारांचा गैरवापर केला तर प्रचालक पद रद्द होऊ शकते. प्रचालक पद रद्द करण्याचे अधिकार फक्त प्रतिपालकांनाच असतात.
प्रचालक स्वत:हून आपले अधिकार काढून घेण्याची विनंती करू शकतात.
दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी
१) दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधी: सलग एक (१) वर्षे एकही संपादन अथवा एकही प्रचालकीय कार्य या दोन्ही पैकी एकही गोष्ट नाही असे प्रचालक/प्रशासक जबाबदारीतून पदमुक्ततेस आपोआप पात्र समजावेत.
२) असे दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक स्वयमेव (आपोआप) पदमुक्ती कालावधीस अनुसरून पदमुक्त झालेले प्रचालक/प्रशासक अथवा स्वतःहून राजीनामा दिलेले सदस्य पुन्हा कार्यरत होऊन प्रचालक/प्रशासक पद विनंती केल्यास त्यांची विनंती प्रचालक मंडळाने ग्राह्य धरल्यास आणि स्वीकृती अधिकाऱ्यांना (प्रशासक) स्विकार्ह झाल्यास त्यांची प्रचालक पदावर सरळ फेर नियूक्ती करतील.
३) कोणत्याही मराठी विकि (मिडिया) प्रकल्पावर कोणत्याही कारणाने प्रचालक संख्या भविष्यात फार घटली तरी किमान एक मराठी भाषी प्रचालक सदैव शिल्लक राहीलाच पाहीजे, नवीन प्रचालक नियुक्ती नंतर अथवा एखादा जुना प्रचालक वापस आल्या नंतरच अशा प्रकल्पावरचा प्रचालक दूर केला जाऊ शकेल.
४) सर्व निवृत्त प्रचालक/प्रशासक (कोणत्याही विशेषाधिकारा शिवाय,) निमंत्रित सदस्य समजले जातील आणि त्यांच्या मतांचा सुयोग्य आदर विकिपीडिया जाणत्यासदस्यां प्रमाणे राखला जाईल.
हे सुद्धा पाहा
- विकिपीडिया:चावडी/प्रबंधकांना निवेदन
- विकिपीडिया:जुने प्रबंधक
- विकिपीडिया:प्रचालक
- विकिपीडिया:प्रतिपालकांनी नियुक्त केलेले प्रचालक
- विकिपीडिया:सध्या कार्यशील नसलेले प्रचालक
- विकिपीडिया:अधिकारी (Bureaucrats)
- विकिपीडिया:प्रतिपालक (Steward)
- विकिपीडिया:झापडबंद अधिकारी सदस्य (Right to oversight)