सामानगड

सामानगड किल्ला
नाव सामानगड किल्ला
उंची समुद्रसपाटीपासून २९७२ फूट उंच
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर, महाराष्ट्र
जवळचे गाव चिंचेवाडी, नौकूड
डोंगररांग
सध्याची अवस्था चांगली
स्थापना {स्थापना}


सामानगड हा गडहिंग्लज तालुका, कोल्हापूर जिल्ह्यातील भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. नजिकचे गाव चिंचेवाडी आहे. गडावर अनेक सुबक वास्तू अस्तित्वात आहेत. पाणी नियोजनासाठी अनेक विहिरी आहेत. अनेक बुरुज, एक चोर दरवाजा देखील आहे. सद्यस्थितीत गडावर - "दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य" या संस्थेमार्फत जतन संवर्धन कार्य सुरू आहे. कोरोना काळात दुर्गवीरांनी जमिनीत पूर्णपणे नष्ट झालेल्या पूर्वाभिमुख महादरवाज्याचे उत्खनन करून संवर्धन केले आहे. तटबंदी बुरुज अनेक वास्तू तग धरून आहेत. इतिहास- १६७४ साली झालेल्या नेसरी खिंडीची लढाई (वेडात मराठे वीर दौडले सात) प्रतापराव गुजर व अन्य सहा वीर ह्याच किल्ल्याशी संबंधित आहे. तसेच १८४४ साली भारत भर झालेल्या "गडकरी उठावाची" सुरुवात ह्याचं किल्ल्यावरील झेंडा बुरुजावरून बंडाचे निशाण फडकवून झाली होती. तत्कालीन झालेल्या युद्धाचे पुरावे इतिहासात आढळतात. युद्धप्रसंगी एक ब्रिटिश उच्च अधिकारी आजाराने त्रस्त होऊन सामानगड परिसरात वारला. त्याच्या स्मरणार्थ गडाच्या पठारावर एक शिलालेख कोरून घेतला आहे. तो देखील पहायला मिळतो. १९२२ सालातील सामानगडचे चित्र कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे पहायला मिळते.

पहा==