हॅशटॅग
हॅशटॅग हा प्रकार सर्वप्रथम ट्विटरच्या [१] माध्यमातून सर्वत्र लोकप्रिय झाला. [२] त्यानंतर तो आता फेसबुक, इन्स्टाग्राम, अशा इतर ‘सोशल नेटवर्क’वर देखील लोकप्रिय होताना दिसत आहे, सोशल नेटवकिंग साईटवर एखादी माहिती पोस्ट केली जाते, माहितीच्या सोबत आपणास # चिन्हाला जोडून काही शब्द लिहिलेले आढळतात, त्यास ‘हॅशटॅग’ असे संबोधले जाते. जी माहिती दिली जात आहे, त्या माहितीचा विषय कोणता आहे? यावरून लक्षात घेऊन ते हॅशटॅग दिलेले असतात.[३]
उदा. - #मीटू
हॅशटॅगचा वापर
शब्दाच्या सुरुवातीला '#' हे चिन्ह वापरलयास हॅशटॅग तयार होतो, तयार झालेला हॅशटॅग निळ्या रंगात दिसतो, दोन शब्द किवा अधिक शब्द वापरायचे झाल्यास ते शब्द एकत्र जोडून लिहावे लागतात, हॅशटॅग वापरताना दोन शब्दांमद्धे अंतर दिल्यास पहिल्या शब्दाचा हॅशटॅग तयार होतो, त्यामुळे शब्द एकत्र जोडून लिहिणे गरजेचे असतात.
चिन्ह
‘#’ हे पाऊंडचं चिन्ह म्हणून ओळखलं जातं, पण सोशल मिडियावरील वापरामुळे सध्या या चिन्हाला पाऊंडपेक्षा हॅशटॅग या नावाने जास्त जास्त ओळखलं जातं.
उपयोग
सोशल मीडियावर जेव्हा हे हॅशटॅग टाकले जातात तेव्हा ते निळ्या अक्षरात दिसतात. पण जर शब्द हॅशटॅगशिवाय असेल तर तो काळ्या रंगात दिसेल. हॅशटॅग वापरलेल्या शब्दापासून एक दुवा (लिंक) तयार होतो. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तो हॅशटॅग किती लोकांनी वापरला हे तुम्हाला दिसून येतं, सोशल मीडियाच्या सर्च बॉक्समध्ये जर तो हॅशटॅगसह शब्द शोधलात तर जगभरातील लोकांनी त्याचा वापर करून लिहिलेल्या गोष्टी वाचायला मिळतात, पर्यायाने हॅशटॅगमुळे माहिती लिहिलेली माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकते. उदा. - कोणत्याही शब्दाच्या आधी हॅशटॅगचं चिन्ह वापरलं जातं आणि नंतर बनतो हॅशटॅग. समजा विकिपीडिया हा नुसता शब्द आहे पण या शब्दाच्या पुढे # हे चिन्ह लावलंत तर ‘#विकिपीडिया’ असा हॅशटॅश तयार होईल, आणि दोन शब्द वापरायचे असल्यास ते जोडून लिहावे लागतात 'विकिपीडिया', 'संपादक' या दोन शब्दांचा हॅशटॅग बनवायचा झाल्यास तो '#विकिपीडियासंपादक' असं तयार होईल.
आपण वापरलेला हॅशटॅग जर पूर्वी वापरला गेला नसेल आणि पहिल्यांदा एखाद्याने तो वापरला असता त्या हॅशटॅगचे तुम्ही निर्माते होता, पण या हॅशटॅगचे प्रथम उपयोगकर्ता म्हणून जरी कोणी असेल तरीदेखील कोणतीही व्यक्ती तो हॅशटॅग वापरू शकते. समंधीत हॅशटॅगचा वापर जितकी जास्त लोकं करतील तितकाच तो हॅशटॅग प्रसिद्ध होत जाईल.
संदर्भ आणि नोंदी
- ^ Chang, Hsia-Ching; Iyer, Hemalata (2012-09-12). "Trends in Twitter Hashtag Applications: Design Features for Value-Added Dimensions to Future Library Catalogues". Library Trends (इंग्रजी भाषेत). 61 (1): 248–258. doi:10.1353/lib.2012.0024. ISSN 1559-0682.
- ^ "'Hashtag' added to the OED – but # isn't a hash, pound, nor number sign" (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.
- ^ "What Characters Can A Hashtag Include?". www.hashtags.org (इंग्रजी भाषेत). 2018-11-02 रोजी पाहिले.