निर्वात

निर्वात स्थिती दर्शवणारा पंप

निर्वात स्थिती म्हणजे, ती जागा, ज्यात (हवेसकट) कोणताच पदार्थ नसणे. अशा स्थितीत जी पोकळी निर्माण होते त्यात वायूचा दाब वातावरणिय दाबापेक्षा बऱ्याच प्रमाणात कमी असतो. १००% निर्वात स्थिती ही जवळजवळ अशक्य असते. एखादी जागा अथवा पोकळी, फक्त काही प्रमाणातच निर्वात करता येऊ शकते.

अभियांत्रिकी व प्रायोजित भौतिकशास्त्रात, निर्वात म्हणजे बाहेरील वातावरणिय दाब कमी असणारी जागा असते.

निर्वात जागेचा दर्जा हा ती जागा किती प्रमाणात १००% निर्वात स्थितीच्या जवळ पोचते यावर अवलंबून असतो.