महावतार बाबाजी

महावतार बाबाजी - ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगीमधील रेखाचित्र. परमहंस योगानंद यांनी हे चित्र स्वतःच्या भेटीच्या आधारे काढवून घेतले होते.

महावतार बाबाजी हे एका भारतीय संताला इ. स. १८६१ ते १९३५ या दरम्यान भेटलेल्या लाहिरी महाशय व लाहिरींच्या अनेक शिष्यांनी[] दिलेले नाव आहे. यांपैकी काही भेटींचे वर्णन परमहंस योगानंद यांनी ऑटोबायोग्रफी ऑफ अ योगी या आपल्या पुस्तकात केलेले आहे.[] या पुस्तकात योगानंद व महावतार बाबाजी यांच्याही भेटीचा तपशील आहे. द होली सायन्स या आपल्या पुस्तकात श्री युक्तेश्वर गिरी यांनीही काही भेटींचा तपशील दिलेला आहे.[] श्री मधुकर नाथ यांच्या आत्मचरित्राप्रमाणे (अप्रेन्टिस्ड टू अ हिमालयन मास्टर) बाबाजी हे शिवरूप होते. आपल्या पुस्तकातील शेवटून दुसऱ्या प्रकरणात त्यांनी बाबाजींनी आपले रूप शिवाप्रमाणे बदलल्याचा उल्लेख केलेला आहे. हे सर्व वृत्तान्त आणि आणखी काही भेटींचा तपशील विविध चरित्रांमध्ये उपलब्ध आहे. [][][] योगानंदांच्या आत्मचरित्राप्रमाणे बाबाजी भारतातील हिमालय क्षेत्रात किमान काही‘शे’ वर्षे राहिलेले होते आणि त्यांना प्रत्यक्ष भेटीत केवळ काही शिष्यांनी व अन्य व्यक्तींनीच पाहिले होते.[] []

संदर्भ व नोंदी

  1. ^ Lahiri Mahasaya, Yukteswar Giri, Ram Muzumdar, Kebalananda, and Pranabananda Giri
  2. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  3. ^ Yukteswar Giri, Sri, The Holy Science. Yogoda Satsanga Society, 1949
  4. ^ Mukhopadyay, Jnananedranath, Srimad Swami Pranabananda Giri, Sri Jnananedranath Mukhopadyay Property Trust, 2001.
  5. ^ Satyananda Giri, Swami Sri Yukteshvar Giri Maharaj, from A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus, iUniverse Inc. 2006. आयएसबीएन 978-0-595-38675-8.
  6. ^ 'Satyananda Giri, Swami, Yogiraj Shyama Charan Lahiri Mahasay, from A collection of biographies of 4 Kriya Yoga gurus, iUniverse Inc. 2006. आयएसबीएन 978-0-595-38675-8.
  7. ^ Yogananda, Paramahansa, Autobiography of a Yogi, 2005. ISBN 978-1-56589-212-5.
  8. ^ indiatoday.intoday.in "Mahavatar Babaji: The unknown 'immortal yogi'". 2017-08-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-08-30 रोजी पाहिले.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत