सूफी पंथ

सूफी पंथ (अरबी: تصوّف - तसव्वूफ, फारसी: صوفی‌گری सूफीगरी, उर्दू: تصوف) हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे.

सूफी या शब्दाची व्युत्पत्ती

सूफी या शब्दाची व्युत्पत्ती अनेक शब्दांतून झाली आहे, असे मत सूफी अभ्यासक डॉ. अलीम वकील यांनी व्यक्त केले आहे. [१]अरबी भाषेत "सूफ‘ म्हणजे चबुतरा.‘साफ‘ म्हणजे शुद्ध व "सोफिया‘ म्हणजे ज्ञान. या दोन शब्दांपासूनही "सूफी‘ हा शब्द तयार झाला आहे.

इस्लामची स्थापना झाल्यानंतरच्या काळात मदिन्यातील मशिदीसमोरील वृक्षाखालच्या पारावर अर्थात चबुतऱ्यावर राहणारे व तेथे बसून धर्माचा अभ्यास करणारे लोक हे ‘सूफी‘ म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी पुस्ती डॉ. वकील जोडतात.[२] महंमद पैगंबर यांना दोन प्रकारे साक्षात्कार झाला. पहिला साक्षात्कर कुराणाच्या रूपात असून् दुसरा समाधी अवस्थेतील होता अशी सूफी पंथाची श्रद्धा आहे. सूफी पंथीयांचा विरक्त आणि संन्यस्त जीवनाकडे अधिक ओढा असतो. त्यांनी श्रद्धा, भक्ती, ध्यान व गुरुभक्ती या गोष्टींवर विशेष भर दिला. भजन, गायन, कीर्तन, मुक्त संचार इत्यादी गोष्टींचा स्वीकार करून सहिष्णू आणि समन्वय वृत्ती वाढविण्याचा प्रयत्न केला. सूफी संप्रदायाचा समावेश इस्लाम धर्मात केला जातो. सूफी शब्दाचा अर्थ् लोकरीशी संबंधित आहे. लोकरीची घोंगडी पांघरून आपल्या मतांचा प्रचार करणाऱ्या फकिरांना सूफी असे म्हणतात. इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर हेच सूफी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक मानले जातात. [३]


भारतातील सूफी परंपरा

इसवी सन तेराव्या शतकात काही सूफी संत दक्षिण भारतात आले. सूफी संताचे औरंगाबाद गंगापूर पैठण दौलताबाद खुलताबाद ही मराठवाड्यातील प्रमुख केंद्रे होती. त्यांतले पैठण हे महत्त्वाचे प्रमुख केंद्र होते. मराठवाड्यात प्रथम मोईजुद्दीन व नंतर निजामुद्दीन यांनी सूफी संप्रदायाचा प्रसार केला. दिल्लीत वास्तव्य असलेल्या निजामुद्दीन अवलियाच्या प्रेरणेने त्याचा शिष्य मुंतजबोद्दीन जर्जरी बक्ष याने आपल्या धर्मप्रचारकांसह महाराष्ट्रात खुलताबादेस मुक्काम केला होता. सूफी पंथ हा गाढ भक्तीचा तसेच वैराग्य तपश्चर्या व मानवतावाद इत्यादींना आदर्श मानणारा संप्रदाय होता.

या पंथाच्या नावाने एक सूफी संगीत परंपरा निर्माण झाली. भारत-पाकिस्तानातील अनेक गायक सूफी संगीत गातात.

जोधा अकबर चित्रपटातले ’ख्वाजा मेरे ख्वाजा...दिल में समाँ जा...शाही का शाह तू... अली का दुलारा’ हे ए. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सूफी संगीताचा एक नमुना आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी