देगलूर विधानसभा मतदारसंघ

देगलूर विधानसभा मतदारसंघ - ९० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार देगलूर मतदारसंघात नांदेड जिल्ह्यातील १. देगलूर आणि २. बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश होतो. देगलूर हा विधानसभा मतदारसंघ नांदेड लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जाती - SC च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[][]

हा मतदारसंघ इ.स. २००९ साली अस्तित्वात आला. त्याआधी याचा बहुतांश भाग बिलोली मतदारसंघात मोडत असे.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जितेश रावसाहेब अंतापुरकर हे देगलूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[] पक्ष
२०२१ (पोटनिवडणूक)[] जितेश रावसाहेब अंतापुरकरपाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१९ रावसाहेब जयंता अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ सुभाष पिराजी साबणे शिवसेना
२००९ चांदोबा उर्फ रावसाहेब अंतापूरकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल

संदर्भ