सातारा विधानसभा मतदारसंघ

सातारा विधानसभा मतदारसंघ - २६२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार सातारा मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील १. जावळी तालुका आणि २. सातारा तालुक्यातील वार्ये, दहीवड, परळी, अंबर्डे, शेंद्रे, सातारा ही महसूल मंडळे आणि सातारा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. सातारा हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[][]

भारतीय जनता पक्षाचे शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[]

आमदार

वर्ष आमदार[] पक्ष
२०१९ शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे भोसले भारतीय जनता पक्ष
२०१४ शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ शिवेंद्रसिंह अभयसिंह भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

सातारा विधानसभा मतदारसंघ

बाह्य दुवे