शाकाहार
शाक/भाजी, हिरव्या वा वाळलेल्या वनस्पती, बिगरमांस (दुग्धजन्य पदार्थ) इत्यादीच फक्त ज्यांच्या आहारात आहे ते (बहुधा सस्तन) प्राणी. शाकाहारी अन्नासाठी ते बंदिस्त केलेल्या पिशवी-डबा इत्यादींच्या वेष्टनावर तसे नमूद करणे अनिवार्य असते. वेष्टनावर पुरशी जागा नसेल तर त्यावर एक हिरव्या रंगाची पट्टी किंवा हिरव्या रंगाचे भरीव वर्तुळ असले तरी काम भागते.
शाकाहारींचे प्रकार
- पेसेटेरियन : ह्यांच्या अन्नात वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी आणि मासे असतात. भारतातले बंगाली ब्राह्मण पेसेटेरियन आहेत.
- फ्लेक्सिटेरियन : एरवी दूध, दुधाचे पदार्थ आणि वनस्पतिजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक प्रसंगी अंडी खातात किंवा मांसाहार करतात.
- राॅ व्हेगन : या लोकांच्या अन्नात दूध किंवा मांसाहारी पदार्थ नसतात. आणि वनस्पतिजन्य पदार्थही कच्चे (४५ अंश सेल्सियसपेक्षा कमी तापमानाचे) असतात. त्यांच्यामते ह्याहून जास्त गरम असलेल्या पदार्थांमधून सर्व पौष्टिकता निघून गेलेली असते.
- लॅक्टो-ओव्हो : हे वनस्पतिजन्य पदार्थ, दूध, दुधाचे पदार्थ आणि अंडी खातात. (लॅक्टो म्हणजे दूध व ओव्हो म्हणजे अंडे!) जगातील बहुतेक शाकाहारी असे असतात. यांना विनोदाने एगेरियन किंवा एगेटेरियन म्हणतात.
- व्हेगन : हे जनावरांपासून मिळणारे पदार्थ (दुधासकट) खात नाहीत, मासेही खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थच खातात. हे लोक चामड्याचे पट्टे, चामड्याची पादत्राणे आदी वस्तूही वापरत नाहीत.
- हिंदू शाकाहारी : हे मटण, चिकन, मासे, अंडी खात नाहीत. फक्त वनस्पतिजन्य पदार्थ आणि दूध किंव दुधापासून केलेले पदार्थ खातात. भारतातील राजस्थानी, गुजराती, हिंदीभाषक, कानडी, तेलुगू, तामिळ, मराठी ब्राह्मण, जैनधर्मीय हे हिंदू शाकाहारी असतात. अशा लोकांनी परदेशी प्रवासाचे तिकीट काढताना त्यावर 'अन्नाची निवड' या पुढे 'हिंदू व्हेजिटेरियन' असे नमूद करणे जरूरीचे असते.
शाकाहारी अन्नपदार्थ
शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारची धान्ये, कडधान्ये, तेले, मसाल्याचे पदार्थ इत्यादींचा समावेश होतो.
धान्ये
कडधान्ये
डाळी
तेल
- शेंगदाणा तेल
- सूर्यफूल तेल
- पाम तेल
- करडई तेल
- जवस तेल
- तीळ तेल
- सरकीचे तेल
- बदाम तेल
- मोहरी तेल
- खोबरे तेल
- तांदळाच्या तुसाचे तेल (Rice Bran Oil)
- ऑलिव्ह तेल
मसाल्याचे पदार्थ
- आले
- काळी मिरी
- जिरे
- दालचिनी
- दगडफूल
- तमालपत्र
- मोहरी (बी)
- लसूण
- लवंग
- हळद
- विलायची
- बडीशेप
- हिंग
- जायफळ
- नागकेशर
- खसखस
भाजीपाला
फळभाज्या
पालेभाजी
शेंगभाजी
कंद
रानभाजी
- अनवे
- अमरकंद
- अळंबी (अळवे)
- अघाडा
- आचकंद
- आलिंग
- उळशाचा मोहर
- कडकिंदा
- कडूकंद
- करटोली / कर्टोल / करटुली (Momerdica Dioica)
- कवदर
- कवळी
- काटे-माठ (Amarantus Spinosus)
- कुड्याची फुले
- कुर्डू
- कुसरा
- कुळू (कोळू)
- कोंबडा
- कोरड
- कोलासने (तालिमखाना)
- कोवळे बांबू
- कोळू
- कौला
- गेंठा
- गोमाठी
- घोळ/घोळू/चिवई/चिवळी (Porthulaca)
- चवळीचे बोके - नवीनच उगवलेल्या चवळीच्या वेलाची टोकाकडची कोवळी पाने
- चाई
- चाईचा मोहर
- चायवळ
- चावा
- चिचारडी
- चिंचुरडा
- चिवलाचे कोंब
- टाकळा (Cassia tora)
- टेंबरण
- टेंभुर्णा
- टेरा/टेहरा
- तरोटा
- तांदुळजा
- तांबोळी
- तेर अळू
- तेल छत्र
- तोंडे
- दिघवडी
- दिवा
- देठा
- धापा
- नारळी
- पंदा
- पिपाना
- फांग
- फांदा
- फोडशी (Celosia Argentea)
- बडकी
- बड़दा
- बहावा
- बांबूचे कोंब
- बेरसिंग
- बोखरीचा मोहर
- बोंडारा
- भारंगी (भारिंगा) (Clerodendrum Serratum)
- भुईपालक
- भुईफोड
- भोकर
- लाल भोपळ्याच्या अगदी छोट्या वेलीला आलेली कोवळी पाने
- भोपळ्याची फुले
- भोपा
- महाळुंग
- माठ
- माड
- मेके
- मोखा/रानकंद मोखा
- मोहदोडे (मोहा)
- रक्त कांचन
- रताळ्याचे कोंब
- रानकेळी
- रानतोंडले
- रानपुदाना
- राक्षस
- रुई
- रुंखाळा
- लोथी
- लोधी
- वांगोटी (वांघोटी) (वाघाटी) (वाघाटा)
- वाथरटे
- शेऊळ (शेवळा/शेवळे) (Amorthophylus Commutatis)
- शेवग्याची पाने व फुले
- सतरा
- सायर
- सुरणाचा कोवळा पाला
- हरबऱ्याची कोवळी पाने
- हळंदा
- हादगा
फळे
- रामफळ
- सीताफळ
- हनुमान फळ
- नारळ
- शहाळे
- केळ
- चिक्कू
- आंबा
- डाळिंब
- जांभूळ
- करवंद
- संत्रे
- मोसंबी
- पपई
- बोर
- कलिंगड
- टरबूज
- खरबूज
- द्राक्ष
- स्ट्रॉबेरी
- अंजीर
- सफरचंद
- फणस
- काकडी
- मिरची
सुकामेवा
पीठ
- कणीक
- मैदा
- तवकीर
- ज्वारीचे पीठ
- भाजणी (बहुधान्य पीठ)
- तांदळाचे पीठ
- साबुदाणा पीठ
- सातू पीठ
- शिंगाडा पीठ
भुकटी
इतर
शाकाहारी पेय
गरम पेय
थंड पेय
- शहाळे
- नीरा
रस
- उसाचा रस
- कलिंगड रस
- डाळिंब रस
दूधयुक्त पेय (मिल्कशेक)
- आंबा दूधयुक्त पेय
- दूध
शाकाहारी खाद्यपदार्थ
रोटी
चपाती/पोळी,
पुरणपोळी,
भाकरी - ज्वारीची / बाजरीची / नाचणीची / तांदळाची
भाजी
या लेखामध्ये भाजीपाला याअंतर्गत उल्लेख असलेल्या सर्व प्रकारच्या पदार्थांची भाजी.
भात
पांढरा भात
फोडणीचा भात
मसाले भात
नारळी भात
पुलाव
बिर्याणी
पातळ पदार्थ
आमटी, कढी
कोशिंबीर
काकडीची कोशिंबीर
टोमॅटोची कोशिंबीर
चटणी
कारळे चटणी
जवस चटणी
लोणचे
लिंबाचे लोणचे
कैरीचे लोणचे
हळदीचे लोणचे
माईनमुळ्याचे लोणचे
तळंण
पापड - उडीदाचे / बटाट्याचे / मुगाचे / तांदळाचे
कुरडई
भजी
गोड पदार्थ
साखर
गुळ
काकवी