मध
मध हा एक कीटकजन्य परंतु औषधी पदार्थ आहे. फुलांच्या परागकणांची मधमाश्यांच्या लाळेशी प्रक्रिया होऊन मध तयार होतो. मध हा नैसर्गिकपणे मिळत असलातरी ज्या पोळ्यांत हा जंगली मध तयार होतो, तेथून तो काढून जमा करणे अवघड असते. त्यामुळे मधुमक्षिका पालन केंद्रांत मधमाश्यांना लाकडी खोक्यांमध्ये मधाची पोळी बांधू द्यायला उद्युक्त केले जाते, आणि त्या पोळ्यांतून नियमितपणे मध गोळा करता येतो.
मधात जो गोडवा असतो तो मुख्यतः ग्लूकोज़ आणि एकलशर्करा फ्रक्टोज मुळे असते. मधाचा प्रयोग औषधि रूपात ही होताे. यात ग्लूकोज व अन्य शर्करा तसेच विटामिन, खनिज आणि अमीनो अम्ल पण असतात ज्यात अनेक पौष्टिक तत्त्व मिळतात जे जख्म ठीक करायला आणि उतकांच्या वाढी साठीच्या उपचारात मदत करते. अस्सल मध चाखल्यानंतर जिभेवर त्या मधाचा गोडवा फक्त पंधरा सेकंदात नष्ट होतो, तर साखरेचा पाक अथवा कृत्रिम मध यांचा जिभेवरील गोडवा पंधरा मिनिटे टिकून राहतो.
मधमाशा हा मध जांभूळ, ओवा, करंज, कारवी, निलगिरी, मोहरी, लिची, शेवगा, सूर्यफूल, हिरडा-गेळा, ओमरेंदा इत्यादी वनस्पतींच्या फुलोऱ्यांतून गोळा करतात. महाबळेश्वरात यांपैकी जांभळाचा मध विपुल प्रमाणात मिळतो. चाफा, जाई, जुई, मोगरा, कमळ, गुलाब ही काही फुलं आहेत.
- ओमरेंदा मध महाराष्ट्र व कोयनेचे जंगल परिसरातून गोळा केला जातो. हा रंगाने पिवळसर आहे, तर मधाची चव स्वादिष्ट आहे.
- करंजाचा मध महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांतून गोळा केला जातो. रंग मध्यम असून, मधाची चव कडवट व विशिष्ट आहे.
- जांभळाचा मध हा सह्याद्रीच्या जंगलांत अधिक प्रमाणात गोळा केला जातो. रंगाने हा मध गडद, तर चवीने कडवट असतो. मधुमेह रुग्णांसाठी हा उत्तम शक्तिवर्धक मध आहे.
- निलगिरीचा मध निलगिरीच्या जंगलात गोळा केला जातो. मधाचा रंग गडद असून, चव मात्र विशिष्ट असते. सर्दी-खोकला व दम्यासाठी हा मध उपयोगी पडतो.
- मोहरीचा मध हा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांतून गोळा केला जातो. हा मध राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या भागातून गोळा केला जातो. या मधाचा रंग पांढरट पिवळा असून, या मधाची चव विशिष्ट असते. हृदयरोगाच्या रुग्णांसाठी हा मध अधिक शक्तिवर्धक समजला जातो.
लिचीचा मध उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यांतून गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असून, चव विशिष्ट आहे. हा मध आरोग्यासाठी स्वादिष्ट आणि शक्तिवर्धक आहे.
- शेवग्याचा मध हा बिहार आणि महाराष्ट्रात गोळा केला जातो. या मधाचा रंग फिकट असला तरी चव मात्र स्वादिष्ट आहे. हा मध व्हिटॅमिन-ई युक्त असल्याने फायदेशीर ठरतो.
- सूर्यफुलाचा मध महाराष्ट्र आणि कर्नाटक भागातून गोळा केला जातो. सोनेरी, पिवळ्या रंगाचा हा मध असला तरी चवीला मात्र हा मध गुळचट आहे. हा मध उत्तम शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो.
- हिरडागेळा हा मधसुद्धा सह्य़ाद्रीच्या जंगल परिसरामध्ये गोळा केला जातो. या मधाचा रंग गडद असून, चव मात्र तुरट आहे. या मधामुळे सर्दी, खोकला, सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.*मध म्हणजे आपल्याला निसर्गाने दिलेलि देणगिच आहे.
आयुर्वेदात मध
आयुर्वेदात मध हा औषध व अनुपान म्हणून वापरण्यात येतो. अनेक औषधे मधातून देतात. आयुर्वेदानुसार मध दिवसाच्या कोणत्या वेळी सेवन केला जातो आणि थंड पाण्यातून की कोमट यांप्रमाणे मधाचे औषधी गुणधर्म बदलतात. सौंदर्य वृद्धीसाठी मध विविध वस्तूंमध्ये मिसळून त्याचा चेहऱ्यावर लेप लावण्याचा सल्ला दिला आहे.
नियमित मध आणि लिंबू घेतल्याने वजन कमी करण्यापासून तजेल त्वचेपर्यंतचा अनेक फायदे होतात. १. लिंबाच्या रसात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि मधामध्ये ॲन्टिबॅक्टेरिअल तत्त्वे असतात. ही तत्त्वे शरीरातून टॉक्सिन्स बाहेर काढतात. लिंबू आणि मध यांच्या एकत्रित सेवनामुळे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढतात आणि पचनक्रिया चांगली होते. २. मध रोज खाल्याने त्वचेवर संक्रमणाचा आणि ॲलर्जीचा धोका कमी होतो. ३. वजन कमी करण्यासाठी मध-लिंबू सेवन खूप फायद्याचे ठरते. ४. मधात नैसर्गिकदृष्ट्या कार्बोहाइड्रेट्स असतात. ही खाल्याने शरीरात ऊर्जेचा स्तर वाढतो आणि मधात लिंबाचा रस टाकला तर ऊर्जा अधिक वाढते. ५. मध आणि लिंबूमध्ये असलेली ॲन्टिऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
आयुर्वेदानुसार मधाचे आठ प्रकार आहेत-
- माक्षिक
- भ्रामर
- क्षौद्र
- पौतिक
- छात्र
- आर्ध्य
- औद्दालिक
- दाल
मधाच्या एका नमून्याचे विश्लेषण फ्रक्टोज़: ३८.२% ग्लूकोज़: ३१.३% सकरोज़: १.३% माल्टोज़: ७.१% जल: १७.२% उच्च शर्करा:१.५% भस्म: ०.२% अन्य/अज्ञात: ३.२%
मधाचे उत्पादन
-
मधमाशीपालक पोळ्यातून चौकटी काढतांना
-
बंद कोष असलेली चौकट
-
मधाचे पोळ्यास धूर देतांना
-
मधमाशा काढताना
-
पोळ्यातील कोष उघडणे
-
कोष उघडण्याचे अवजार
-
सुरी वापरून हाताने कोष उघडतांना
-
मध काढणे
-
मध गाळणे
-
मध भांड्यात टाकणे
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |